Maharashtra Board 10th 12th Result 2024 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २१ मे ला 12वी बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, MSBSHSE बोर्ड त्यांच्या अधिकृत वेबसाइट- mahresult.nic.in वर विद्यार्थी आपले गुण तपासून पाहू शकतात. एकाच वेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी या साईटवर लॉग इन करत असल्याने साईट क्रॅश होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून डिजीलॉकर किंवा मोबाईल SMS वर सुद्धा आपण निकाल पाहू शकता.

निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट: mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in.

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

 • अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
 • मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 लिंक तपासा.
 • लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
 • एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
 • निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

DigiLocker वर १० वी, १२ वी चा निकाल कसा तपासायचा?

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने माहिती दिली की २०१७ पासूनचे महाराष्ट्रातील किमान ५.४ लाख विद्यार्थ्यांचे डिजिटल प्रमाणपत्रे डिजिलॉकरवर उपलब्ध आहेत. १९९० पासून ते आजच्या तारखेपर्यंत डिजीलॉकरमध्ये ३.५ कोटी १२वीच्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड आणि ५.५ कोटी १०वीच्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड आहेत. यंदा सुद्धा महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या निकालाची लिंक DigiLocker ॲप आणि वेबसाइट – digilocker.gov.in वर उपलब्ध असेल.

 1. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
 2. आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
 3. डाव्या साइडबारवर, ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
 4. ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
 5. तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
 6. उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
 7. तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
 8. डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.

हे ही वाचा<< Career Options After 10th : दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करणार? पाहा एकापेक्षा एक बेस्ट पर्याय

MSBSHSE नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान ३५ % गुण मिळणे आवश्यक आहे.