Maharashtra Board HSC Result 2025 : आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. बारावी हा विद्यार्थी जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. बारावीनंतर करिअरची दिशा ठरते. त्यामुळे बारावीमध्ये चांगले टक्के मिळावेत, अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. जर तुम्हाला यंदा बारावीत कमी गुण मिळाले, तर टेन्शन घेऊ नका. चांगले क्षेत्र निवडून तुम्ही करिअर घडवू शकता. आज आपण बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले तरी कोणते चांगले कोर्सेस तुम्ही निवडू शकता, याविषयी जाणून घेणार आहोत.

वेब डिझाईन

​भारतात गेल्या काही वर्षांमध्ये वेब डिझाईनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डिजिटल क्षेत्रात प्रत्येक कंपनीला एक उत्तम वेबसाइट हवी असते आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे. वेब डिझाईनचा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना येथे चांगली संधी मिळू शकते. १२ वी सायन्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतरही तुम्ही हा कोर्स निवडू शकता. जर तुमच्याकडे वेब डिझाईनमधी पदवी असेल आणि तुम्ही त्यात कुशल असाल, तर तुम्हाला या क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. भारतातील अनेक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही वेब डिझाईन स्पेशलायजेशनमध्ये बॅचलर पदवी घेऊ शकता.

अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स

मीडिया क्षेत्रात अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्समध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यावसायिकांची गरज असते. त्यामुळे बारावी आर्ट शाखेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतरसुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता. या क्षेत्रात सीनियर अ‍ॅनिमेशन / व्हीएफएक्स सुपरवायझरचा वार्षिक पगार १५ लाखांपर्यंत असू शकतो. जगभरात चित्रपटसृष्टी वेगाने बदलत आहे. अशात चित्रपट क्षेत्रात कुशल अ‍ॅनिमेशन व्यावसायिकांना मोठी मागणी आहे.

Direct link to check Maharashtra HSC Result 2025 : येथे पाहा बारावीचा निकाल

एअर होस्टेस/केबिन क्रू

उत्तम संवादकौशल्य असलेली व्यक्ती एअर होस्टेस किंवा केबिन क्रू म्हणून करिअर करू शकते. हा सर्वांत जास्त मागणी असलेल्या करिअर पर्यायांपैकी एक आहे. एअर होस्टेस किंवा केबिन क्रू म्हणून काम करण्यासाठी खूप संयम, कार्यक्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता, समयसूचकता आवश्यक असते. १२वीमध्ये आर्ट विषयात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतरसुद्धा तुम्ही हा सर्वोत्तम कोर्स करू शकता.

मीडिया पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन क्षेत्राने खूप लोकप्रियता मिळवली आहे. अनेक विद्यार्थ्यांचा या क्षेत्रात करिअर करण्यास रस वाढत असल्याचे दिसून आले आहे. हा कोर्स ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थीसुद्धा करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना १२ वी कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील ते विद्यार्थीही हा कोर्स निवडू शकतात. तुम्हाला फक्त या क्षेत्रात रस असणे, तसेच पत्रकारितेची आवड असणे आवश्यक आहे. क्रिएटिव्हीटी आणि लेखनाची आवड असलेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. हे क्षेत्र खूप मोठे आहे आणि १२ वी नंतर मास कम्युनिकेशन कोर्स केल्यानंतर तुम्ही पत्रकारिता, चित्रपट, टीव्ही, जाहिराती व जनसंपर्क या क्षेत्रांत करिअर करू शकता.

फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी

१२वी सायन्स शाखेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतर हा सर्वोत्तम कोर्स तुम्ही करू शकता. फोटोग्राफी व सिनेमॅटोग्राफी हे भारतातील फाइन आर्ट्स आणि सायन्सचे अतिशय लोकप्रिय विषय आहेत. अनेक कॉलेजमध्ये फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी या दोन्हींमध्ये बॅचलर, मास्टर आणि डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. चित्रपट उद्योग, मासिके आणि ई-कॉमर्स साइट्समध्ये फोटोग्राफर्सना मोठी मागणी आहे.

फॅशन डिझायनिंग

​भारतात फॅशन डिझायनिंगचा कोर्स अलीकडेच खूप लोकप्रिय झाला आहे. बारावी आर्ट्स शाखेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतरसुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता. मनीष मल्होत्रा रितू कुमार यांसारखे प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स कोट्यवधी रुपये कमावतात.

इव्हेंट मॅनेजमेंट

इव्हेंट मॅनेजमेंट हे अतिशय लोकप्रिय क्षेत्र आहे. सार्वजानिक मेळावे आणि घरगुती कार्यक्रम, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच संगीत कार्यक्रमांचे नियोजन, आयोजन व व्यवस्थापन करणे ही इव्हेंज मॅनेजमेंटची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यासाठी कुशल इव्हेंट मॅनेजर्सची आवश्यकता असते. हा कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात नाव कमावू सकता. बारावी कॉमर्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतरही तुम्ही हा कोर्स निवडू शकता.

ट्रॅव्हल आणि टुरिझम मॅनेजमेंट

​इव्हेंट मॅनेजमेंटप्रमाणेच ट्रॅव्हल आणि टुरिझम मॅनेजमेंट हे एक आव्हानात्मक, पण तितकेच हटके क्षेत्र आहे. या क्षेत्रात येण्यासाठी Travel & Tourism Management मध्ये बॅचलर कोर्स निवडता येतो. १२वी सायन्स शाखेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवल्यानंतर हा कोर्स लोकप्रिय पर्यायांपैकी एक मानला जातो. भारतातील अनेक विद्यापीठे या कोर्ससाठी बॅचलर पदवी देतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उद्योजकतेसाठी चांगली संधी प्राप्त होऊ शकते
कला सादरीकरण – अभिनय, नृत्य, संगीत आणि थिएटर

कला क्षेत्र

अभिनय, नृत्य, संगीत व थिएटर यांच्याशी संबंधित कोर्स निवडून तुम्ही हटके करिअर घडवू शकता. हे अतिशय मनोरंजक; पण तितकेच आकर्षक क्षेत्र आहे, ज्यांनी बारावी आर्ट्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवले, ते लोक हा कोर्स करू शकतात. हा अतिशय लोकप्रिय व आकर्षक कोर्स आहे. कला क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक चांगला पर्याय ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mahresult.nic.in 2025: तुमची HSC गुणपत्रिका ऑनलाइन कशी पडताळावी?

विद्यार्थी शाळेतून मिळालेली HSC ची हार्डकॉपी गुणपत्रिका खरी आहे की नाही, हे ऑनलाइन पडताळून पाहू शकतात. ऑनलाइन डेटाबेसमध्ये 1990 पासूनचे सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:


तपशील


माहिती
बोर्डाचे नावमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
परीक्षामहाराष्ट्र SSC व HSC परीक्षा 2025
SSC परीक्षा सुरू होण्याची तारीख21 फेब्रुवारी 2025
SSC परीक्षा समाप्तीची तारीख17 मार्च 2025
HSC परीक्षा सुरू होण्याची तारीख11 फेब्रुवारी 2025
HSC परीक्षा समाप्तीची तारीख11 मार्च 2025
परीक्षा वेळासकाळ: 11:00 ते दुपारी 2:00