महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या पाऊणशेहून अधिक शाखांमध्ये पदवी शिक्षण उपलब्ध आहे, त्यातील काही शाखा खूप हटके असून राज्यातील फक्त ३-४ महाविद्यालयांत उपलब्ध आहेत. त्यामुळे या अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात.
येत्या आठवड्यात महाराष्ट्र इंजिनीअरिंग सीईटीचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थी सर्वसाधारण पणे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर अशाच पारंपरिक अभियांत्रिकी शाखांची निवड करतात मात्र महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या पाऊणशेहून अधिक शाखांमध्ये पदवी शिक्षण उपलब्ध आहे, त्यातील काही शाखा खूप हटके असून राज्यातील फक्त ३-४ महाविद्यालयांत उपलब्ध आहेत. त्यामुळे या अभियांत्रिकी शाखांमध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. मात्र विद्यार्थ्यांनी या शाखांची, त्यातील संधींची माहिती करुन घेऊन त्या शाखांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा काही हटके शाखांविषयी जाणून घेऊ यात.
पेट्रोलियम अभियांत्रिकी
विद्याुत वाहन निर्मिती ने जोर पकडला असला तरी आणखी काही दशके तरी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची आवश्यकता व महत्व शिल्लक राहणारच आहे. या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या अभियंत्यांची गरज निरंतर लागणार असून त्यात ड्रिलींग प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणी करणारा ड्रिलिंग अभियंता , तेल व वायू साठ्यातून अधिकतम उत्पादन काढण्याचे तंत्र राबणारा रिझर्व्हायर अभियंता, उत्पादन व प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर देखरेख ठेवणारा उत्पादन अभियंता आणि तेल व वायूपासून रसायनांचे उत्पादन व प्रक्रिया राबवणारा पेट्रोकेमिकल अभियंता अशा विविध अभियंत्यांची गरज असते. अन्य क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनॅलिटिक्स चा वापर करून उत्पादन कार्यक्षमता वाढवणे आवश्यक बनले आहे. या क्षेत्रात करीअर करण्यासाठी बारावीनंतर पेट्रोलियम अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी आणि आवश्यकतेनुसार पदव्युत्तर शिक्षण घेणे काळाची गरज आहे.
प्रिंटींग आणि पॅकेजिंग टेक्नॉलॉजी
डिजिटल युगातही प्रटिंींगचं महत्व अबाधित आहे आणि ते कायमच राहील स्क्रीन प्रिंटींग , ऑफसेट प्रिंटींग, डिजिटल प्रिंटींगफ्लेक्सो प्रिंटींग , स्पेशालिटी प्रिंटींग अशा सर्वच क्षेत्रांचा सातत्याने विकास होतो आहे. पॅकेजिंग इंडस्ट्री सुद्धा वर्षाला २०-२५ टक्के दराने वाढत आहे. रिसायकलिंग आणि पुनर्वापर यांची वाढती गरज लक्षात घेता या क्षेत्रात विविध नवनवीन मटेरियल वापरले जात आहेत.या पार्श्वभूमीवर प्रिंटींग आणि पॅकेजिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात उत्तम करीअर संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहेच पण त्या बरोबरीने संशोधनाच्या संधीही वाढत आहेत. बारावीनंतर या क्षेत्रात चार वर्षांचा अभियांत्रिकी पदवी कोर्स उपलब्ध असून पदव्युत्तर शिक्षणाच्या ही उत्तम संधी उपलब्ध आहेतच पण त्याशिवाय रोजगार व स्वयंरोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध आहेत.
पर्यावरण अभियांत्रिकी
ग्लोबल वॉर्मिंगमुळे उद्याोग क्षेत्रात कमीतकमी प्रदूषण करणारी टेक्नॉलॉजी आणणं काळाची गरज बनली आहे.
आज स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये शिकून तयार झालेला विद्यार्थी हा बेरोजगार राहू शकत नाही कारण आज जवळपास प्रत्येक कंपनीमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची गरज आहे आणि हे ओळखूनच भारत सरकारने सुद्धा आज प्रत्येक कंपनीमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी किंवा अभियंता असणं अनिवार्य आहे असा नियमच केला आहे.
आज देशातल्या अनेक नामवंत उद्याोग समूहांमध्ये, शासकीय एनजीओंमध्ये, खासगी क्षेत्रांमध्ये पर्यावरण अभियांत्रिकीमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असंख्य अशा संधी उपलब्ध आहेत जिथे हे विद्यार्थी काम करू शकतात आणि चांगला रोजगार मिळवू शकतात. बारावीनंतर हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.
धातू शास्त्र अभियांत्रिकी
आज संपूर्ण जग धातूंच्या वापरावर अवलंबून आहे. धातू खाणींमधून काढण्यापासून ते शुद्ध स्वरूपात आणण्यापर्यंत, त्यापासून कास्टिंग, फोर्जिंग , पत्रे , वायर्स अशा विविध वस्तू बनवण्यापर्यंत धातू शास्त्राची व्याप्ती आहे. वाहन उद्याोगापासून ते अंतराळयानापर्यंत आणि अवजड उद्याोगांपासून ते पीसीबी पर्यंत प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या धातूची गरज असतेच. उत्पादन क्षेत्रात उत्पादन , संशोधन, गुणवत्ता नियंत्रण या सर्व क्षेत्रात धातू शास्त्रातील अभियंत्यांची गरज असते. स्टील, तांबे, अॅल्युमिनियम, जस्त पासून सोनं, चांदीपर्यंत सर्वच धातूंना सर्वच क्षेत्रात मागणी आहे. बारावीनंतर धातू शास्त्र या विषयांत चार वर्षांचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून तो पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहन उद्याोगापासून ते संशोधन क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांत करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
vkvelankar@gmail. com