scorecardresearch

Premium

एमपीएससी मंत्र: भूगोल प्रश्न विश्लेषण; नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ जून रोजी प्रस्तावित आहे. मागील लेखांमध्ये पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.

mpsc exam
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

रोहिणी शहा

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ जून रोजी प्रस्तावित आहे. मागील लेखांमध्ये पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखापासून भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकांमधील भूगोल घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.

mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल प्रश्न विश्लेषण
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in Marathi
MPSC मंत्र : इतिहास प्रश्न विश्लेषण
nano dap
अर्थसंकल्प २०२४ : सरकार ‘मेड इन इंडिया’ नॅनो डीएपी खताचा वापर वाढवणार; नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा होणार फायदा?
Union Budget 2024-25 Nirmala Sitaraman
Budget 2024 : “२०१४ च्या पूर्वीच्या गैरकारभारावर श्वेतपत्रिका काढणार”, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

मागील तीन वर्षांतील प्रातिनिधिक प्रश्न पाहणे यासाठी उपयुक्त ठरेल.

प्रश्न १. जोडय़ा जुळवून योग्य पर्याय निवडा.
अ. घुमटाकार पठार क. दख्खन पठार
ब. ज्वालामुखी पठार कक. विंध्य पठार
क. सोपानाकार पठार ककक. छोटा नागपूर पठार
ड. गिरीपाद पठार कश्. शिलांग पठार
’ पर्यायी उत्तरे
१) अ – क, ब – ककक, क – कश्, ड – कक
२) अ – कक, ब – कश्, क – ककक, ड – क
३) अ – ककक, ब – क, क – कक, ड – कश्
४) अ – कश्, ब – कक, क – क, ड – ककक

प्रश्न २. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
अ. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र ७८० पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत.
ब. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या ५० टक्के कोळसा ओरिसा, छत्तीसगढ व झारखंड या राज्यांतून येतो.
’ पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब बरोबर
२) अ बरोबर ब चूक
३) अ चूक ब बरोबर
४) अ आणि ब चूक

प्रश्न ३. जनगणना २०११ प्रमाणे खालील जिह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळाखा.
अ. कोल्हापूर ब. जळगाव
क. पुणे ड. नागपूर इ. सोलापूर
’ पर्यायी उत्तरे
१) ब, इ, ड, अ, क २) अ, क , ड, ब, इ ३) क, ड, अ, इ, ब ४) क, अ, ड, ब, इ

प्रश्न ४. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा.
अ. नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने बांधला.
ब. नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे.
क. कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो.
’ पर्यायी उत्तरे
१) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
२) विधाने ब आणि क बरोबर आहेत.
३) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.
४) विधाने अ, ब आणि क बरोबर नाहीत

प्रश्न ५. खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्यायाची निवड करा.
विधान अ: पृथ्वीचा परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते.
विधान ब: स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणावेळ पद्धतीचा अवलंब केला जातो.
’ पर्यायी उत्तरे
१) विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
२) विधान अ बरोबर असून ब चूक आहे.
३) विधान अ चूक असून ब बरोबर आहे.
४) विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

या प्रातिनिधिक प्रश्नांवरून तयारी करताना विचारात घ्यायचे पुढील मुद्दे लक्षात येतात. सरळसोट एका शब्दा/ वाक्याचा पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण नगण्य आहे. बहुविधानी प्रश्नांमध्येही योग्य अयोग्य विधाने शोधणे अशा ठरावीक स्वरूपाबरोबरच जोडय़ा लावणे, कथन- कारण शोधणे, निष्कर्ष शोधणे, क्रम लावणे असेही प्रश्न विचारलेले दिसून येतात. यामध्ये जोडय़ा लावणे प्रकारच्या प्रश्नांवर आयोग बहुतांश वेळ भर देताना आढळतो.
भूगोलाच्या शाखा, सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक या बाबींवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे.

नकाशावर किंवा आकृत्यांवर आधारीत प्रश्न मागील तीन वर्षांत विचारलेले दिसून येत नाहीत. पण पूर्वी किमान एका प्रश्नाचा समावेश असायचा हे लक्षात घेऊन नकाशावरील प्रश्नांचा सराव करत राहणे फायद्याचे ठरेल. लोकसंख्या भूगोलावरही किमान एक प्रश्न विचारलेला दिसतो.उर्वरीत अभ्यासक्रमातील घटकांवरील प्रश्नांची संख्या दरवर्षी बदलताना दिसत असली तरी मागील प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणावरून एखाद्या वर्षी कोणता घटक जास्त किंवा कमी महत्त्वाचा असेल याचा अंदाज घेणे कठीण नाही.

तरीही भूरूपे, जागतिक हवामान, महाराष्ट्रातील व देशातील महत्त्वाची शहरे, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे भाग नेहमीच कटढ यादीत असले पाहिजेत. बहुविधानी प्रश्न सोडविण्यास नकाशा समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून मदत होते. तसेच वारंवार आकृत्या / चित्र पाहत उजळणी केल्यास भूरूपे या घटाकावरील कोणत्याही प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप पाहता मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ते आत्मविश्वासाने सोडविता येतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा आधी मूलभूत संकल्पना समजून घेणे व त्यानंतर नकाशावर आधारीत अभ्यास व शेवटी तथ्यात्मक अभ्यास अशा क्रमाने करणे फायदेशीर ठरते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc mantra civil services gazetted combined preliminary examination amy

First published on: 28-04-2023 at 00:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×