रोहिणी शहा

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

Nitin Gadkari appeal on achieving higher economy sangli
उच्च अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा; नितीन गडकरी यांचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
maharashtra government forced barti sarathi mahajyoti to adopt uniform guidelines
विश्लेषण : स्वायत्त संस्थांसाठी ‘समान धोरणा’चा स्पर्धा परीक्षार्थींना फटका कसा?
Merit List of State Services Exam Announced Vaishnavi Bavaskar first rank
MPSC Results: राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल
Government discloses data on missing women in nagpur
धक्कादायक… ८ महिन्यांत नागपुरातून १३०० हून अधिक महिला बेपत्ता; प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांतून पलायन…
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?
Ramdas athawale, Dahanu,
महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची गरज काय – रामदास आठवले

● प्रश्न १. राजकोषीय नीतीची साधने कोणती?

अ. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज

ब. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना

क. करारोपण आणि अंदाजपत्रक

ड. संसद आणि प्रशासन

पर्यायी उत्तरे:

(१) अ फक्त (२) ब आणि क फक्त

(३) ड फक्त (४) अ आणि क फक्त

● प्रश्न २. योग्य जोड्या जुळवा:

( a) देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्याोग ( i) सूती कापड उद्याोग

( b) देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्याोग ( ii) लोह व स्टील उद्याोग

( c) जलद औद्याोगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्याोग ( iii) साखर उद्याोग

( d) नवीन तंत्रज्ञानाचा वापर ( iv) वाहन उद्याोग

पर्यायी उत्तरे :

( a) ( b) ( c) ( d)

(१) ( ii) ( i) ( iii) ( iv)

(२) ( iii) ( ii) ( i) ( iv)

(३) ( iii) ( i) ( ii) ( iv)

(४) ( iii) ( iv) ( i) ( ii)

● प्रश्न ३. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही ?

(१) दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे.

(२) शहरीकरण व रोजगारवाढ यांच्यात सहसंबंध नाही.

(३) शहरीकरणासोबत लोकांच्या रहाणीमानाच्या दर्जात वाढ होते.

(४) शहरीकरण व दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे.

● प्रश्न ४. पुढील विधाने विचारात घ्या.

( a) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर २००१ मध्ये सुरू करण्यात आली.

( b) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी २००६ मध्ये सुरू करण्यात आली.

( c) नेहरू रोजगार योजना (NRY) आक्टोबर १९८९ मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली.

वर दिलेल्या विधान/ विधानांपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहे/आहेत?

(१) ( a) फक्त

(२) ( b) फक्त

(३) ( a) व ( b) फक्त

(४) ( a) व ( c) फक्त

● प्रश्न ५. चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन ( FRBM) कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला?

(१) वित्तीय एकत्रीकरण निधी (२) वित्तीय तूट

(३) महसुल आणि कर्ज व्यवस्थापन

(४) कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा

● प्रश्न ६. ऑगस्ट १९९१ मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती?

(१) डॉ. राजा जे. चेलैया

(२) एम. नरसिंहम

(३) डॉ. सुखमॉय चक्रवर्ती

(४) डॉ. अबीद हुसेन

● प्रश्न ७. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत ?

अ. सर्वसमावेशक विकास

ब. हरित वाढ

क. युवा शक्ती

ड. आर्थिक क्षेत्र

पर्यायी उत्तरे:

(१) अ आणि ड

(२) ब आणि क

(३) अ आणि ब

(४) अ, ब, क आणि ड

वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

पारंपरिक मुद्दे, मूलभूत संकल्पना आणि चालू घडामोडी या सगळ्यांचा समावेश प्रश्नांमध्ये केलेला दिसून येतो. सर्व उपघटकांना महत्त्व दिलेले असल्यामुळे सर्व उपघटक कव्हर करणे आवश्यक आहे. वित्तीय क्षेत्रातील समित्या, योजना, लोकसंख्या, मूलभूत संकल्पना, योजना आयोग/ निती आयोगाच्या शिफारशी आणि अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी अहवाल या मुद्द्यांवर दरवर्षी प्रश्न विचारण्यात आले आहेत.

दरवर्षी पारंपरिक मुद्द्यांवर दोन ते तीन प्रश्न विचारलेले दिसतात. त्यातही राजकोषीय निती, वित्त आयोगाच्या शिफारशी यांवर हमखास प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे त्यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

चालू घडामोडींमध्ये योजना, अर्थसंकल्पातील तरतुदी, आर्थिक पाहणी अहवालामधील आकडेवारी अशा मुद्द्यांवर भर दिलेला दिसून येतो.

बेरोजगारी/ रोजगारनिर्मिती/ दारिद्र्य निर्मूलन यांवर सन २०२३ मध्ये जास्त भर दिलेला दिसून येतो. त्यामुळे हा मुद्दा यापुढे जास्त महत्त्व देऊन अभ्यासणे आवश्यक आहे. बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण लक्षणीय आहे. आणि सरळसोट प्रश्नांमध्ये पूर्ण वाक्ये किंवा मोठे पर्याय समाविष्ट असलेले प्रश्न बरेच आहेत. त्यामुळे मूलभूत संकल्पना सनजून घेऊन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखामध्ये पाहू.