रोहिणी शहा

गट ब सेवा अरापत्रित मुख्य परीक्षेचा पेपर एक हा तिन्ही पदांसाठी संयुक्त असतो तर पेपर दोन त्या त्या पदानुसार वेगळय़ा अभ्यासक्रमाचा पदनिहाय स्वतंत्र असतो. या स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. चारही पदांसाठीच्या पेपरमध्ये राज्यव्यवस्था घटक हा सामायिक असला तरी त्यातील काही भाग चारही पदांसाठी आहे तर काही भाग केवळ सहायक कक्ष अधिकारी, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी आहे.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
The High Court asked the Central Election Commission why the applications of the interested candidates were rejected print politics news
निर्धारित वेळेआधी इच्छुक उमेदवारांचे अर्ज का नाकारले? केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची विचारणा
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?

आयोगाने सर्व पदांसाठी पेपर दोनमध्ये विहीत केलेला राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे

भारतीय राज्यघटना

(सर्व पदांसाठी)घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका

(सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांसाठी अतिरीक्त मुद्दे)

राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधी मंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल :

भारताची राज्यघटना

भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना असावी याबाबत स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये वेळोवेळी झालेल्या मागण्या, ठराव व त्याबाबतच प्रयत्न व त्यामागील भूमिका या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

घटना कशी तयार झाली याबाबत तयारी करताना घटना समितीची रचना, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीमधील महाराष्ट्रातील सदस्य, समितीच्या बैठका व त्यातील प्रसिद्ध चर्चा, समितीचे कार्य याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपसमित्यांचे विषय आणि अध्यक्ष व सदस्य यांचा आढावा घेतल्यास फायद्याचे ठरेल.

घटनेची प्रस्तावना, त्यामागील वेगवेगळय़ा नेत्यांच्या भूमिका व प्रतिक्रिया, त्यामध्ये समाविष्ट तत्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्देही व्यवस्थित समजून घ्यावेत.

मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबबतचे सर्व अनुच्छेद मूळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहीत पाठच करायला हवेत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटना दुरुस्त्या व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

राज्याच्या धोरणाची सर्व नीतीनिर्देशक तत्वे समजून घेणे आवश्यकच आहे. मात्र शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका या मुद्दय़ांचा अभ्यासक्रमामध्ये विशेष उल्लेख केलेला असल्याने त्याबाबतचे अनुच्छेद, तरतुदी व त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व केलेले कायदे समजून घ्यावेत. उदा. शिक्षण हक्क कायदा, न्यायपालिकांमधील नेमणुकांची कोलेजियम पद्धत व त्याबाबत शासन व न्यायपालिकेमधील संघर्ष इत्यादी.

राज्यघटनेतील महत्त्वाचे अनुच्छेद हे केंद्र व राज्य संबंध व घटनादुरुस्ती तसेच घटनात्मक पदे यांपुरती मर्यादीत ठेवता येतील. मात्र, राजकीय चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्या त्या मुद्दय़ांशी संबंधित अनुच्छेदांना महत्त्व देऊन त्यांचेवर अभ्यासामध्ये भर देणे आवश्यक आहे.

केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आर्थिक व कायदेशेर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे याबाबतचे अनुच्छेद समजून घ्यावेत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.

राज्य शासन

हा भाग फक्त सहायक कक्ष अधिकारी, विक्री कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या पदांसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये नाही. 

विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका, स्वीकृत सदस्यांच्या नेमणुका, सर्व सदस्यांचा कार्यकाळ, त्यांना पदावरून हटविणे, राजीनामा, हक्क या मुद्दय़ांशी संबंधित राज्यघटनेतील अनुच्छेद आणि तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे.

राज्यपाल व मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक, कार्यकाळ, त्यांना पदावरून हटविणे, राजीनामा या सर्व मुद्दय़ांशी संबंधित राज्यघटनेतील अनुच्छेद आणि तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना असलेले विशेषाधिकार समजून घ्यावेत. विधानमंडळातील विधी समित्यांचा अभ्यास त्यांचा विषय, त्यांची रचना, कार्ये व अधिकार या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजाची माहिती असायला हवी. विधेयके, त्यांचे प्रकार, त्यांचेशी संबंधित घटनेतील तरतुदी, कायदा निर्मिती प्रक्रिया तसेच विविध प्रश्न / ठराव इत्यादी कामकाजाचे महत्त्वाचे नियम माहीत असायला हवेत.