फारुक नाईकवाडे

स्पर्धा परीक्षांना त्यांचे वेगळेपण देणारा ‘चालू घडामोडी’ हा घटक उमेदवारांसाठी म्हटले तर इंटरेस्टिंग आणि म्हटले तर आव्हानात्मक ठरतो. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर एखादी राज्य – राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना असतेच हे समजून घ्यायला हवे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा आधार बनला पाहिजे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे :

UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील

अभ्यासक्रम अशा प्रकारे पाच – सहा शब्दात मांडलेला असेल त्यावेळी अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा याची योग्य दिशा ठरवून घेणे आवश्यक ठरते. यासाठी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन आणि विश्लेषण करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक लक्षात यायला लागला की समजावे आपण योग्य ट्रॅकवर आहोत.

गट क सेवेसाठीच्या मुख्य परीक्षांच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी कशी करावी ते पाहू:

जागतिक चालू घडामोडी

यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्ती विशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

साहित्य क्षेत्रातील आंतरराष्टीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.

चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

भारतातील चालू घडामोडी:

शासकीय योजनांचे उद्दीष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दीष्टे यांचा टेबलमध्ये नोटस काढून अभ्यास करावा. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मात्र मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास उत्तम.

संरक्षण घटकामध्ये पारंपरिक आणि अद्ययावत असे दोन्ही मुद्दे विचारण्यात येतात. त्यामुळे भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम, भारतात विकसित करणारी संस्था किंवा विदेशातून आयात केले असल्यास सबंधित देश व कंपनी या मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच इतर देशांशी भारताने संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प, युद्धाभ्यास यांचाही आढावा घेणे आवश्य्क आहे.

राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

महाराष्ट्रातील चालू घडामोडी

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार व त्यांचे या व मागील वर्षांचे विजेते माहीत असायला हवेत.

राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने, त्यांचे ठिकाण, अध्यक्ष असल्यास त्याबाबतची ठळाक घडामोड यांची माहिती असायला हवी.

राज्य शासनाच्या नवीन आणि चर्चेत असलेल्या जुन्या योजनांची तयारी उद्दीष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दीष्टे या आधारावर टेबलमध्ये नोट्स काढून करावी.

राज्य स्तरावरील राजकीय घडामोडी, महत्त्वाची धोरणे, महत्त्वाचे आणि चर्चेतील प्रकल्प, चर्चेत असलेल्या सामाजिक समस्या माहीत असणे आवश्यक आहे.

राज्य स्तरावर चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी

यामध्ये निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात. भारताचे द्वीपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचा भाग आहेत. शासकीय धोरणे व चर्चेतील महत्त्वाचे निर्णय यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्याव्यात. नवीन धोरणांशी संबंधित आधीच्या धोरणांचा आढावा घेता आल्यास उत्तम.

पर्यावरणाशी संबंधित वन अहवाल, प्रदूषणाशी संबंधित निर्देशांक, हवामान बदलाशी संबंधित अद्ययावत घडामोडी, संमेलने व त्यातील ठराव,  कवउठच्या याद्यांमध्ये समाविष्ट भारतातील प्रजाती, असल्यास हरित न्यायाधिकरणाचे चर्चेतील निर्णय यांचा आढावा घ्यावा.

अर्थव्यवस्था घटकाच्या चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत स्वतंत्र लेखामध्ये याआधी चर्चा करण्यात आली आहे.

खगोलशस्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.

साथीचे रोग, त्यावरचे उपाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्त्वाच्या घोषणा यांचा आढावा घ्यायला हवा.