Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड स्कूल येथे भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १६ मार्चपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल असणार आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : भरतीसाठीची आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, शैक्षणिक पात्रता यांबाबतची माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या – मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड ही भरती ॲप्रेंटिस पदाच्या – फिटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / प्लंबर / पेंटर आणि इतर ट्रेड आदी ३०१ रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – सर्व पदे – (i) ५० टक्के गुणांसह ८ वी, १० वी उत्तीर्ण (ii) ६५ टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण – मुंबई

हेही वाचा…Karagruh Police Bharti 2024: मुंबईत नोकरीची मोठी संधी! कारागृह विभागात ‘या’ पदासाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

उमेदवारांना या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि ॲडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठविण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.