राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई अंतर्गत ‘समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १,९७४ (अजा – १४३, अज – १०३, विजा-अ – ३०, भज-ब – ६०, भज-क – २९, भज-ड – ०, विमाप्र – ७२, इमाव – २४३, एसईबीसी – १९७, आदुघ – १९७, खुला – ९००) समांतर आरक्षण – महिला – ३० टक्के, मा.सै. – १५ टक्के, खेळाडू/प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, भूकंपग्रस्त – २ टक्के, पदवीधर अंशकालीन – १४ टक्के, अपंग – ४ टक्के. (एकूण ७९ पदे अस्थिव्यंग एक पाय (ओएल) ५० टक्के अपंगत्व), अनाथ – १टक्के (एकूण २० पदे अनाथ)).
पात्रता – बीएएमएस/बीयूएमएस/बी.एससी. (नर्सिंग)/बी.एससी. (कम्युनिटी हेल्थ) पदवी. (आयुर्वेद व यूनानी पदवीधारक यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी आणि एनएमसी/एमसीआयएम नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य) (बी.एससी. (नर्सिंग)/बी.एससी. (कम्युनिटी हेल्थ) पदवीधारक यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी नर्सिंग काऊन्सिल नोंदणी केलेली असावी व नोंदणी प्रमाणपत्र आणि पदवीचे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य.)
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
वयोमर्यादा – (४ डिसेंबर २०२५ रोजी) खुला प्रवर्ग – ३८ वर्षे; मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ – ४३ वर्षे; अपंग/प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त – ४५ वर्षे; अंशकालीन – ५५ वर्षे.
निवड पद्धती – प्रवेश परीक्षा संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न प्रत्येकी १ गुण, एकूण १०० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. (विषयाचे ज्ञान ६० गुण, सामान्य ज्ञान – २० गुण, एनएचएम प्रोग्राम विषयी – २० गुण) परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी. प्रवेश परीक्षेत पात्रतेसाठी किमान ४५ गुण मिळविणे आवश्यक. प्रवेश परीक्षेची तारीख आणि निकाल https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र प्रशिक्षणा दरम्यान निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर Exit Exam यशस्वीरित्या उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून सुरूवातीला ११ महिने आणि २९ दिवसांसाठी नियुक्ती दिली जाईल. (वेतन दरमहा रु. २५,०००/- आणि रु. १५,०००/- कामावर आधारित मोबदला प्रती माह दिला जाईल.) अतिदुर्गम, आदिवासी भागात नियुक्ती दिल्यास रु. १५,०००/- अतिरिक्त कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
ऑनलाइन अर्ज https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावेत. (अर्ज भरणे व सादर करणेबाबत आवश्यक सूचना संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये परिच्छेद ३ मध्ये उपलब्ध आहेत.)
