सुहास पाटील

१) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL) (भारत सरकारचा उपक्रम) Advt. No. NPCIL/ HRM/ ET/२०२४/०२. एक्झिक्युटिव्ह ट्रेनीपदांची GATE २०२२/२०२३/२०२४ स्कोअरवर आधरित भरती.

डिसिप्लिननुसार एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या रिक्त पदांचा तपशील –

एकूण रिक्त पदे – ४०० (अजा – ६१, अज – ३२, इमाव – १०९, ईडब्ल्यूएस – ३९, खुला – १५९). यात बॅकलॉगच्या पदांचा समावेश आहे. (अजा – १, अज – २, इमाव – १)

(१) मेकॅनिकल – १५० पदे (अजा – २३, अज – १२, इमाव – ४१, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ६०).

(२) केमिकल – ७३ (अजा – ११, अज – ६, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ७, खुला – २९).

(३) इलेक्ट्रिकल – ६९ (अजा – ११, अज – ५, इमाव – १९, ईडब्ल्यूएस – ७, खुला – २७).

(४) इलेक्ट्रॉनिक्स – २९ (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).

(५) इन्स्ट्रूमेंटेशन – १९ (अजा – ३, अज – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७).

(६) सिव्हील – ६० (अजा – ९, अज – ५, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २४).

एकूण २१ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV – ६, D/ HH – ४, OA/ OL etc. – ४, एएसडी/आयडी/एमआय – ७ साठी राखीव.

हेही वाचा >>> Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या

पात्रता – संबंधित विषयातील बी.ई./ बी.टेक. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित सब्जेक्ट कोडमधील GATE २०२२, २०२३ किंवा २०२४ चा स्कोअर.

कमाल वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०२४ रोजी २६ वर्षे. (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षे, दिव्यांग – ३६ वर्षे)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना १ वर्ष कालावधीच्या पुढील स्ट्रीमप्रमाणे Induction Course साठी पाठविले जाईल.

(१) प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) स्ट्रीम

(२) लाईट वॉटर रिअॅक्टर (LWR) स्ट्रीम

सिव्हील विद्याशाखा वगळता इतर विद्याशाखांतील पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाइन अर्जामध्ये रिअॅक्टर स्ट्रीमसाठी पसंती द्यावी लागेल.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजना (ETs) DAE च्या इस्टॅब्लिशमेंटवरील भारतभरातील लोकेशन्स किंवा परदेशात नेमणूक दिली जाईल. काही ETs ना TAPS १ २ ऑपरेटिंग स्टेशन तारापूर येथे नेमले जाईल.

स्टायपेंड – ETs ना दरमहा रु. ५५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. पुस्तकांसाठी अलाऊन्स रु. १८,०००/- एकदाच दिले जातील. ETs ना NPCIL चे लॉजिंग व बोर्डिंग अनिवार्य आहे.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ETs ला ‘सायंटिफिक ऑफिसर-सी’ (ग्रुप-ए) वर कायम केले जाईल.

वेतन – पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००) अंदाजे वेतन रु. १.०० लाख प्रतिमाह.

याशिवाय परफॉर्मर्स, लिंक्ड् इन्सेंटिव्ह दिले जाईल.

निवड पद्धती – GATE २०२२/ २०२३/ २०२४ च्या स्कोअरनुसार १:१२ प्रमाणात शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा इंटरह्यू ३ ते १५ जून २०२४ दरम्यान घेतला जाईल.

अंतिम निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल. (प्रतीक्षा यादी सप्टेंबर २०२४ पर्यंत ग्राह्य असेल.)

मेडिकल फिटनेस पाहून अंतिम निवड करताना GATE स्कोअर विचारात घेतला जाणार नाही. निकाल www. npcilcareers.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

इंटरह्यू पुढील सेंटर्सवर घेतले जातील – अणुशक्ती नगर, मुंबई; नरोरा अॅटॉमिक पॉवर स्टेशन NAPS, उत्तर प्रदेश; मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन (MBPS) तमिळनाडू आणि कैगा जनरेटिंग स्टेशन ( KGS), कर्नाटक. इंटरह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रं तपासली जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जात GATE २०२२, २०२३, २०२४ च्या अॅडमिट कार्डवर GATE अथॉरिटीजने दिलेला रजिस्ट्रेशन नंबर नोंद करणे आवश्यक.