Indian Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुमचेही हे स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होऊ शकते. कारण भारतीय रेल्वे कॉनस्टेबल आणि सब-इन्स्पेक्टरच्या पदांसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी वयोमर्यादा किती आहे? शैक्षणीक पात्रता किती आहे? अर्ज कुठे करायचा ? निवड प्रक्रिया काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. ही भरती प्रक्रिया ४६६० पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. १४ मे २०२४ ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Indian Train Viral Video Will Make You Angry
भारतीय रेल्वेमधील ‘हा’ प्रसंग बघून नेटकरी संतापले, स्लीपर कोचमध्ये घडलं तरी काय, नेमका प्रसंग घडला कुठे?
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?

शैक्षणीक पात्रता किती आहे ?

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सब-इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वांरांचे वय १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ ते २८ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी वयाचा दाखला सादर करावा लागणार आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

रेल्वेतील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा (CBT 1 आणि CBT 2), एक शारीरिक चाचणी आणि शेवटी कागदपत्र पडताळणी पास करावी लागेल. हा प्रत्येक टप्पा पास करणाऱ्या उमेदवाराती अंतिम निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल.

अर्ज करण्याची तारीख आणि वेबसाईट

RPF कॉन्स्टेबल किंवा सब-इन्स्पेक्टर पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार १५ एप्रिल २०२४ पासून १४ में २०२४ पर्यंत rrbapply.gov.in. या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

अर्ज फी
सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी ५०० रुपये इतकी फी आहे, तर SC, ST, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना २५० रुपये इतकी फी आहे. ही फी ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

वेतन

RPF SI म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ४३,००० आणि ५२,००० इतके दरमहा वेतन मिळेल. तर RPF कॉन्स्टेबलला दरमहा ३७,२३५ ते ४१,१४१ इतके वेतन मिळेल.

हेही वाचा >> १०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या

कसा कराल अर्ज

१. सर्वप्रथम rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. नोकरी विभागावर क्लिक करा आणि संबंधित पद (कॉन्स्टेबल किंवा सब-इन्स्पेक्टर) निवडा.
३. मूलभूत माहिती भरुन User Id आणि पासवर्ड जनरेट करुन नोंदणी करा.
४. User Id आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
५. सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज अचूकपणे भरा.
६. शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा आणि फोटोसह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्जाची फी ऑनलाइन भरा.
७. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि सबमिट करा.
८. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत आणि पेमेंट पावती जपून ठेवा