NTRO Recruitment 2023: राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) ही भारताची एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे. विश्लेषक पदांच्या भरतीसाठी एनटीआरओने अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार एनटीआरओच्या अधिकृत संकेतस्थळ ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतो. यासाठी अर्ज प्रक्रिया ०५ एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ३५ पदे भरली जातील. मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना या पदांवर (सरकारी नोकरी) नोकरी करायची आहे, त्यांनी प्रथम या गोष्टी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
एनटीआरओ भरतीसाठी भरल्या जाणार्या पदांची संख्या
एकूण पदांची संख्या ३५
एनटीआरओभरतीसाठी शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यप्राप्त संस्थेमधून कोणत्याही विषयामधून पदवीधर असला पाहिजे.
हेही वाचा: IRDAIमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या ४५ पदांसाठी होणार भरती, लवकर भरा अर्ज
एनटीआरओ भरतीसाठी वयोमर्यादा
जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्यांची जास्तीत जास्त वयोमर्यादा ३० वर्ष असली पाहिजे.
एनटीआरओ भरतीसाठी मिळणारा पगार
एनटीआरओ भरतीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार दिला जाईल.
एनटीआरओ भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
लिंक आणि अधिसूचना
एनटीआरओ भरती २०२३साठी अर्ज पाठविण्याची लिंक -https://ntro.gov.in/ntroWeb/loadRecruitmentsHome.do
एनटीआरओ भरती २०२३साठी नोटिफिकेशन – file:///C:/Users/ONLINE/Downloads/ADVT%20(1).pdf
एनटीआरओ भरतीसाठी लक्षात ठेवण्याच्या तारखा
एनटीआरओ भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: ०५ एप्रिल २०२३
एनटीआरओ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मे २०२३