ONGC Recruitment 2023 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओएनजीसीद्वारे अप्रेंटीस पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार ओनएनजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता. ओएनजीसीच्या या भरती मोहिमदरम्यान, २५०० पदांची भरती होणार आहे. अर्जाची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख २० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की ओनएनजीसी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता, अर्जाची योग्यता, निवड प्रक्रिया इत्यादीची सविस्तर माहितीसाठी अधिसुचना काळजीपूर्वक वाचा.

ओएनजीसी भरतीच्या महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – १ सप्टेंबर २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०२३
ONGC निवड परिणाम- ५ ऑक्टोबर २०२३

वयोमर्यादा –

ONGC च्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. वय २० सप्टेंबर २०२३ रोजी गणले जावे.

निवड प्रक्रिया :

पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सामान्य गुण असलेल्या उमेदवारांची निवड वय ज्येष्ठतेच्या आधारावर केली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही ONGC ची अधिकृत वेबसाइट पाहू शकता.

हेही वाचा – SBI मध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा

अधिसुचना – https://ongcindia.com/documents/77751/2660534/apprenticeship2023.pdf/788211c7-a0f3-826c-a62a-166826bed9ca

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानधन:

ग्रॅज्युएट अप्रेंटीस – रु. ९०००
डिप्लोमा अप्रेंटिस – रु. ८०००
ट्रेड अप्रेंटिस – रु. ७०००