RITES Recruitment 2024: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसेस (RITES) लिमिटेडने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अभियांत्रिक व्यावसायिक (Engineering Professionals) या पदासाठी कराराच्या (Contract basis) आधारावर अर्ज मागविले आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ मार्च असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार http://www.rites.com या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
RITES Recruitment 2024: या भरतीसाठी रिक्त पदे , अर्ज फी, अर्ज, उमेदवारांची निवड कशी होणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त जागा आणि पदे : ८ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.
सीनिअर पूल इंजिनिअर कम टीम लीडर : २
सीनिअर महामार्ग इंजिनिअर कम टीम लीडर: २
सीनिअर फुटपाथ विशेषज्ञ: २
निवासी महामार्ग इंजिनिअर : २
अर्ज फी : जनरल / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी ६०० रुपये, तर ईडब्ल्यूएस / एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्जाची फी ३०० रुपये आहे.
कशी होईल निवड ?
रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेड, शिखर, प्लॉट नंबर १, सेक्टर २९, गुरुग्राम (दिल्ली) येथे १५ मार्च रोजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मुलाखत घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता.
लिंक : https://www.rites.com/Upload/Career/92_24-95_24_pdf-2024-Feb-29-17-11-23.pdf
अर्ज कसा कराल ?
- रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.rites.com ला भेट द्या.
- होमपेजवर करिअर विभागाला भेट द्या आणि नंतर ऑनलाइन नोंदणीवर जा.
- नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
- सर्व आवश्यक माहिती (details) भरा.
- अर्ज फी भरा.
- संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.