SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये सध्या वैद्यकीय अधिकारी [Medical Officer] या रिक्त पदावर भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याचे पात्रता निकष काय आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे या सगळ्याची माहिती पाहा. तसेच नोकरीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे, हे ही इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.
SAI recruitment 2024: पद आणि पदसंख्या
भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण तीन जागांवर भरती करण्यात येणार आहे.
SAI recruitment 2024: शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे –
उमेदवाराकडे औषधी आणि शस्त्रक्रियेमध्ये बॅचलर्सचे [एमबीबीएस] कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
त्यासह या क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
अथवा
खेळ क्षेत्रातील PG/DNB / ऑर्थोपेडिक/ PMR या क्षेत्रातील शिक्षण अथवा दोन वर्षांचा अनुभव असावा.
अथवा
PDGSM क्षेत्रातील शिक्षण आणि तीन वर्षांचा अनुभव असावा.
SAI recruitment 2024: वेतन
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवारास, १ लाख २५ हजार रुपये इतके वेतन देण्यात येईल.
SAI recruitment 2024 – भारतीय क्रीडा प्राधिकरण अधिकृत वेबसाईट –
https://sportsauthorityofindia.gov.in/sai/
SAI recruitment 2024 – अधिसूचना –
https://sportsauthorityofindia.gov.in/sai/public/assets/jobs/1713252958_m%20o%20officer_organized.pdf
SAI recruitment 2024: अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवाराने त्यासह आपली सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी.
नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी करणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २ मे २०२४ अशी आहे.
या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्याची उमेदवारांसाठी ४५ वर्षांची वयोमर्यादा ठेवली आहे.
वैद्यकीय अधिकारी पदाच्या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट तसेच अधिसूचना वर नमूद केली आहे.