AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये युटिलिटी सध्या विविध पदांवर भरती होणार आहे. नेमकी कोणत्या पदांवर किती रिक्त जागा आहेत याची माहिती पाहा. तसेच, नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज करण्यासाठी पात्रता निकष आणि अंतिम तारीख काय आहे ते जाणून घ्या.

AIATSL recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

युटिलिटी एजंट / रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी एकूण १३० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
BMC jobs opening news in marathi
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हॅण्डीमन / हॅण्डीवूमन या पदांसाठी एकूण २९२ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ४२२ रिक्त पदांवर एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये युटिलिटी भरती करून घेण्यात येणार आहे.

AIATSL recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

युटिलिटी एजंट / रॅम्प ड्रायव्हर पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढीलप्रमाणे शिक्षण आवश्यक आहे –

उमेदवाराकडे एसएससी / दहावीपर्यंतचे शिक्षण असावे. तसेच उमेदवाराने मुलाखतीसाठी येणार आपले HMV ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे आवश्यक आहे.

हॅण्डीमन / हॅण्डीवूमन या पदांसाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढीलप्रमाणे शिक्षण आवश्यक आहे –

उमेदवाराकडे एसएससी / दहावीपर्यंतचे शिक्षण असावे. तसेच उमेदवारास इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे. दोन्ही भाषा वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

हेही वाचा : IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती

AIATSL recruitment 2024 – एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड वेबसाइट –
https://www.aiasl.in/index

AIATSL recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20Chennai%20%20Station.pdf

AIATSL recruitment 2024 : वेतन

युटिलिटी एजंट / रॅम्प ड्रायव्हर पदावर निवड झालेल्या उमेदवाराला २४,९६०/- रुपये वेतन देण्यात येईल.

हॅण्डीमन / हॅण्डीवूमन पदावर निवड झाल्यास उमेदवाराला २२,५३०/- रुपये वेतन देण्यात येईल.

AIATSL recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांवर इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
मुलाखतीस जाताना उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
वरील नोकरीच्या मुलाखती या २ व ४ मे २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत.
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.