Success Story: उदयपूरच्या दिग्विजय सिंह या २० वर्षांच्या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात छंद म्हणून चॉकलेट बनवण्यास सुरुवात केली. चॉकलेट कसे बनवले जाते हे तो यूट्यूबवरील विविध व्हिडीओ पाहून शिकला. हळूहळू त्याचा हाच छंद तब्बल १०० कोटी व्यवसायापर्यंत पोहोचला आहे. ‘सारम’ या ब्रँडखाली तो आपली उत्पादने विकतो. ही कंपनी आता देशभरात चॉकलेट विकते. फक्त छंद म्हणून केलेल्या गोष्टीचे रुपांतर व्यवसायातही होऊ शकते, हे दिग्विजय सिंहकडून शिकण्यासारखे आहे. दिग्विजय सिंहचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

अशी झाली व्यवसायाची सुरुवात

लॉकडाऊनच्या कठीण काळात आपले मन गुंतवण्यासाठी अनेकांनी नवनवीन छंद जोपासले. या काळात कोणी डान्स तर कोणी गाणी, तर अनेक जण सोशल मीडियावर रील्स बनवू लागले. दिग्विजयने अनेकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि त्याने घरीच चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला. चॉकलेट बनवायला सुरुवात केली तेव्हा दिग्विजय १६ वर्षांचा होता. त्याच्या या छंदाने त्याला आता उद्योजक बनवले आहे. आता दिग्विजय ‘सारम’ नावाची स्वतःची कंपनी चालवतो, जी उत्कृष्ट चॉकलेट बनवते. दिग्विजयने आतापर्यंत दोन टनांहून अधिक चॉकलेट विकले आहेत. त्याच्या चॉकलेट्सचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्थानिक फळे, त्यात केशर आणि मनुकेदेखील वापरतो; त्यामुळे त्याच्या चॉकलेटची चव अनोखी बनते.

उदयपूरमध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आता दिल्ली, बेंगळुरू, जयपूरसारख्या शहरांमध्ये पोहोचला आहे. उदयपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दिग्विजयला नेहमी काहीतरी वेगळं करायचं होतं. कोविड काळात तो घरी असताना त्याने चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या भावाबरोबर मिळून चॉकलेट बनवायला सुरुवात केली. दिग्विजय यूट्यूबवरून चॉकलेट कसे बनवायचे हे शिकला आणि आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना ते खायला देण्यास त्याने सुरुवात केली.

हेही वाचा: Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! एका लहान खोलीत राहण्यापासून ते करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये दिग्विजयला कार शोरूममधून चॉकलेट्सची पहिली मोठी ऑर्डर मिळाली. त्यातून त्याने लाखो रुपये कमावले. याचवर्षी त्याने ‘साराम’ हा ब्रँड लॉन्च केला. या ब्रँडने देशभरात दोन टनांहून अधिक चॉकलेटची विक्री केली आहे.