Success Story Of Anil Jangid : एखादे स्वप्न मनात घर करून राहिले की मग दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. मग त्यासाठी आपण लाख रुपयांची नोकरी सोडणे असो किंवा कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहण्याचा देखील निर्णय घेऊ शकतो. तर आज आपण अशाच एका तरुणाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने गायनाच्या आवडीमुळे कॉर्पोरेट नोकरी सोडली .

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अहमदाबाद येथील माजी विद्यार्थी आणि एकेकाळी अमेझॉनमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अनिल जांगिडने गायक बनण्यासाठी आपले कॉर्पोरेट करिअर सोडले. तसेच त्याच्या प्रवासाबद्दलची एक पोस्ट मित्र श्रवण टिकूनू यांनी लिंक्डइनवरून शेअर केली आहे.

जिवलग मित्राने सांगितल्याप्रमाणे अनिल जांगिडची काही वर्षांपूर्वी अमेझॉनमध्ये काम करत असताना श्रवण टिकूनू याच्याबरोबर भेट झाली होती. अनिल जांगिडला एनआयटीके, आयआयएम अशा उत्तम शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी आणि चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा होती, पण त्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात होती.

https://www.linkedin.com/posts/shravantickoo_sunlozara-activity-7327936807839420418-WNQu?utm_source=social_share_send&utm_medium=android_app&rcm=ACoAAFNu-gkBpMfOPPTVsQkC7MVaOpX2OvfjeJ0&utm_campaign=copy_link

हे छंद म्हणून रेकॉर्ड केलं आहेस का (Success Story)

श्रवणच्या मते, अनिल जांगिड अनेकदा स्टार्टअप्स सुरू करण्याबद्दल किंवा कोणत्यातरी गोष्टीची कमतरता भासत असल्याचे बोलायचा. त्यानंतर त्याने स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याची अमेझॉनची नोकरी सोडली आणि काही दिवसांनंतर श्रवण आणि अनिलचा संपर्क तुटला. एका वर्षानंतर अनिलने स्वतःचा एक फोटो श्रवणला पाठवला. तो मॉडेलसारखा दिसत होता. तेव्हा श्रवणने विचारले की, “तू नक्की काय करतो आहेस.” त्याने श्रवणला सांगितले की, “त्याला लेखनाची प्रचंड आवड आहे.” लेखनाच्या या प्रेमामुळे अनिलने एक गाणे लिहिले आणि त्याचे रेकॉर्डिंग श्रवणला पाठवले आणि सांगितले की, आता तो पूर्णवेळ गायनाकडे लक्ष देणार आहे.

रेकॉर्डिंग ऐकून श्रवणने विचारले, “हे छंद म्हणून रेकॉर्ड केलं आहेस का?” त्यावर अनिल म्हणाला, “नाही भावा, मी गायक बनण्याचा सराव करत आहे.’ हे ऐकून श्रवणला धक्का बसला आणि त्याने हा प्रवास इतरांबरोबर शेअर करण्याचे ठरवले. कारण अनिल प्रत्यक्षात सर्व गोष्टींपासून दूर गेला होता आणि त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत होता, ज्याबद्दल बरेच लोक फक्त बोलतात. आपल्यातील अनेक जण कलाकार किंवा निर्माते होण्याचे स्वप्न पाहतात आणि अनिलने ते स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस दाखवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट linkedin च्या @Shravan Tickoo या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि मित्राची संपूर्ण गोष्ट सांगत ‘”काही जण जग बदलण्याची जिद्द मनात ठेवतात, पण अशा लोकांना वेडं म्हटलं जातं. पण, तेच प्रत्यक्षात जग बदलतात”; अशी कॅप्शन देऊन पोस्टचा शेवट केला आहे. तसेच कमेंटमध्ये Spotify वर त्याने गायलेले गाणे इतरांना ऐकवण्यासाठी लिंकसुद्धा जोडली आहे.