Success Story of Bhogi Sammakka: तेलंगणातील डम्मापेटा गावातील भोगी सम्मक्का हिने आपल्या परिश्रमाने केवळ आपल्या कुटुंबालाच गौरव मिळवून दिला नाही तर समाजात एक आदर्श निर्माण केला. भोगी सम्मक्काने तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TGPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्याख्याता पद मिळवले, तेलंगणा पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण केली आणि TGPSC गट IV उत्तीर्ण केली आणि कनिष्ठ सहाय्यक म्हणून निवड झाली.

घरी अभ्यास करत स्वतःवर विश्वास ठेवला

भोगी सम्मकाने तिची तयारी संपूर्णपणे घरी केली. कोणत्याही कोचिंगची मदत न घेता, सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी ती आपल्या मेहनतीवर विसंबून राहिली. सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी कोचिंगची गरज नाही, तर आत्मविश्वास आणि योग्य दिशेने कठोर परिश्रम पुरेसे आहेत, असे तिचे मत आहे.

हेही वाचा… अंडी विक्रेत्याचा मुलगा होणार न्यायाधीश! आईने काढलेल्या कर्जावर घेतलं शिक्षण, वाचा आदर्श कुमार यांचा थक्क करणारा प्रवास

कुटुंबाची प्रेरणा शक्ती बनली

भोगीची आई भोगी रमणा या अंगणवाडी शिक्षिका आहेत आणि वडील सत्यम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमीने तिला समाजाप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली आणि पुढे जाण्याची हिंमत दिली. तिने प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केले आणि उस्मानिया विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली.

यूपीएससीची तयारी सुरू केली

तीन सरकारी नोकऱ्या असूनही भोगी सम्मक्का हिचा प्रवास इथेच संपत नाही. संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. ती सांगते की हा प्रवास अवघड नक्कीच आहे, पण अशक्य नाही.

हेही वाचा… लग्नाच्या १८ वर्षानंतर उत्तीर्ण केली UPPSCची परीक्षा, तीन मुलांना सांभाळत केली तयारी; वाचा दीपा भाटी यांचा प्रेरणादायी प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजासाठी प्रेरणा

भोगी सम्मकाची कथा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे, जे मर्यादित संसाधने असूनही मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करतात. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही, हे तिच्या मेहनतीने आणि संघर्षाने तिने सिद्ध केले. कोचिंगशिवाय गावात राहून एवढे मोठे यश मिळवणे सोपे काम नाही, पण अशक्यही नाही.