IAS Nidhi Gupta: अनेक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांची त्यांच्या कामाच्या आणि अनुभवाच्या जोरावर वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली झाली आहे. अलीकडेच, आयएएस निधी गुप्ता वत्स प्रसिद्धीच्या झोतात आल्या जेव्हा त्यांच्या उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात बदली झाली. त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया निधी गुप्ता वत्स यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ या.

UPSC मध्ये तिसरा क्रमांक

निधी गुप्ता वत्स या २०१५ च्या IAS अधिकारी आहेत. त्या आधी हरियाणा कॅडरच्या IAS होत्या. मात्र लग्नानंतर त्यांचे कॅडर बदलून उत्तर प्रदेश केले गेले. यूपीएससी परीक्षेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता. बी.टेक केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. निधी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना या निर्णयात पूर्ण पाठिंबा दिला.

हेही वाचा… अवघ्या पाच महिन्यांत कमावले २८६ कोटी, आयआयटीचं शिक्षण सोडून धरली ‘ही’ वाट; वाचा राहुल राय याच्या यशाचं सीक्रेट

या महाविद्यालयातून घेतलं शिक्षण

निधी यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे शालेय शिक्षणही दिल्लीत झाले. निधी लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दहावीनंतर विज्ञान विषय निवडला आणि बारावी नंतर अभियांत्रिकी शिकण्याचा पर्याय निवडला. निधी गुप्ता यांनी नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, द्वारका, दिल्ली येथून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे.

या महत्त्वाच्या पदांवर केलं आहे काम

निधी यांची पहिली पोस्टिंग आग्रा जिल्ह्यातील असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली होती. नंतर त्यांना जॉइंट मॅजिस्ट्रेट आणि लखनौचे अतिरिक्त गृहनिर्माण आयुक्त करण्यात आले. यानंतर त्या हरदोई जिल्ह्याच्या मुख्य विकास अधिकारी (CDO) झाल्या. निधी यांनी उत्पादन शुल्क विभागाचे विशेष सचिव म्हणूनही काम केले आहे. अमरोहाच्या डीएम होण्यापूर्वी त्या बरेलीच्या महापालिका आयुक्त होत्या.

हेही वाचा… वडिलांचा शिक्षणाला विरोध, पण मुलीने मानली नाही हार; वाचा मेहनतीने स्वप्न साकार करणाऱ्या कविताची गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाले सफाईसाठी आल्या होत्या चर्चेत

निधी गुप्ता याआधीही त्यांच्या कामामुळे अनेकदा चर्चेत आल्या आहेत. बरेली महापालिका आयुक्त म्हणून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या स्वत: साफसफाई करताना दिसत होत्या. निधी यांनी पाच वेळा UPSC CSE परीक्षा दिली होती, त्यापैकी त्यांना दोनदा यश मिळाले.