Success Story Of Manmohan Singh Rathore In Marathi : नोकरीच्या तुलनेत सध्या अनेक जण व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. काही जण त्यांच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करतात, अनेक जण त्यांच्या नवनवीन कल्पना घेऊन मार्केटमध्ये उतरतात, तर आज आपण अशाच एका व्यावसायिकाबद्दल जाणून घेणार आहोत (Success Story Of Manmohan Singh Rathore ), ज्यांनी सैन्याची नोकरी ते प्रसिद्ध हस्तकला व्यवसाय असा प्रवास केला आहे. तर त्यांचा प्रवास कसा होता यावर एक नजर टाकूया.

राजस्थानमधील बिकानेर येथील मनमोहन सिंग राठोड (Success Story Of Manmohan Singh Rathore) हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. मनमोहन सिंग राठोड यांचे वडील राजस्थान खनिज आणि खाण विभागात चालक म्हणून काम करत होते. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मनमोहन यांचे बिकानेर येथील प्राथमिक शिक्षण सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आणि त्यांनी सिटी माध्यमिक विद्यालयातून मध्यवर्ती शिक्षण पूर्ण केले. महाराजा गंगा सिंग विद्यापीठाची मान्यता असलेल्या बिकानेरच्या ढुंगर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

बीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना मनमोहन यांची भारतीय लष्करात शिपाई म्हणून निवड झाली. २००४ मध्ये त्यांची पोस्टिंग झाली. सैन्यात नोकरी हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि मनमोहन यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. पण, २००८ मध्ये परिस्थितीने आश्चर्यकारक वळण घेतले. त्याच्या आईची तब्येत बिघडू लागली आणि वडिलांची दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग असल्यामुळे घरी तिची काळजी घेणारे दुसरे कोणीच नव्हते. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी मनमोहन यांना सैन्याची नोकरी सोडावी लागली, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता.

हेही वाचा…Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट

सैन्यात केवळ चार वर्षांच्या सेवेमुळे मनमोहन पेन्शनसाठी पात्र मानले जात नव्हते. अशा स्थितीत त्यांच्यावर पुन्हा आर्थिक संकट आले. यानंतर ते राजस्थान, दिल्लीत नोकरी शोधू लागले. पण, कुठेच त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यांनी दिल्लीत आयटी प्रशिक्षण घेतले आणि काही काळानंतर त्यांनी आयटी उद्योगात काम करण्यास सुरुवात केली (Success Story Of Manmohan Singh Rathore) .

ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला

एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान ते जोधपूरमध्ये सहलीला गेले होते. इथेच त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. तेथे त्यांनी राजस्थानी हस्तकला पाहिल्या आणि या कलेत त्यांना व्यवसायाची मोठी संधी दिसली. राजस्थानी हस्तकलेला जगभरात ओळख मिळू शकेल असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला. कोर्स पूर्ण केल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने त्याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये त्याने Craftyther.com नावाचा स्टार्टअप सुरू केला, जो जागतिक बाजारपेठेत राजस्थानी हस्तकला उत्पादने विकतो. त्यांच्या स्टार्टअपमुळे कारागीरांना रोजगार मिळतो, जे राजस्थानी हस्तकलेचे तज्ज्ञ आहेत.

आपल्या व्यवसायाबद्दल सांगताना मनमोहन सिंग राठोड म्हणाले की, “जेव्हा मी माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे राजस्थानच्या कारागीरांची उत्पादने अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वसारख्या देशांमध्ये विकली जात असल्याचे पाहतो, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. आज १०० हून अधिक हस्तकला कारागीर त्यांच्या कंपनीत सामील झाले आहेत आणि त्यांची उत्पादने Amazon सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर विकली जात आहेत.” तर मनमोहन यांची कथा हे सिद्ध करते की, कठोर परिश्रम तुम्हाला इतरांसाठी प्रेरणा बनण्यासाठी जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतात (Success Story Of Manmohan Singh Rathore) .

Story img Loader