Success Story Of Chitraang Murdia In Marathi : देशातील कोणत्याही IIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा म्हटला की, JEE ची परीक्षा देणं आवश्यक असतं. JEE mains आणि JEE Advance परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच तुम्हाला IIT ला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे ही परीक्षा देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. तरीही संपूर्ण भारतातून हजारो विद्यार्थी दरवर्षी IIT JEE प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याचे आणि IIT मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पाहत असतात; तर काही हुशार विद्यार्थी IIT JEE प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होतात. आज आपण अशाच एका विद्यार्थ्याबद्दल (Success Story Of Chitraang Murdia ) जाणून घेणार आहोत, ज्याने IIT JEE परीक्षा पासून IIT बॉम्बे मध्ये प्रवेश घेतला खरा. एक वर्षानंतर त्याने आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्यासाठी IIT सोडले.

चितरांग मुरडिया (Chitraang Murdia) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे (Success Story Of Chitraang Murdia ). हा विद्यार्थी २०१४ मध्ये JEE Advanced मध्ये AIR-1 (ऑल इंडिया रँक १) मिळविणारा विद्यार्थी होता. IIT बॉम्बे मध्ये संगणक शास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने फिजिक्समध्ये पदवी घेण्यासाठी Massachusetts Institute of Technology (MIT) मध्ये प्रवेश घेतला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा…Success Story Of Abhishek Bakolia : UPSC टॉपर अपाला मिश्राने निवडला तिचा जोडीदार, वाचा कोण आहे अभिषेक बकोलिया

एक वर्षातच टॉपरने आयआयटी सोडण्याच्या घेतला निर्णय :

पण एक वर्षातच आयआयटी-जेईई टॉपरने आयआयटी बॉम्बे सोडण्याच्या निवडीने अनेकांना गोंधळात टाकले. त्यांनी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला स्पष्टीकरण देताना सांगितले की, या निवडीमुळे माझ्या मित्रांसह सर्व जण आश्चर्यचकित झाले. “तू अजून लहान आहेस आणि असे क्षेत्र बदलण्याचे निर्णय घेऊ शकत नाहीस. तू आयआयटीमधून इंजिनियरिंगची पदवी घेऊन तुम्ही लाखो रुपये कमवशील,” असे अनेक जण त्याला म्हणायचे.

चित्रांग मुरडिया यांनी असा दावा केला होता की, आयआयटी सोडून आपल्या व्यवसायाचा पाठपुरावा करण्याच्या त्याच्या निवडीमुळे विद्यार्थी प्रेरित होतील. तसेच या विद्यार्थ्याने असे निरीक्षण केले की, गणित आणि भौतिकशास्त्रात चांगली कामगिरी करणारे अनेक विद्यार्थी आजकाल इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि संगणक विज्ञानासारख्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. हे त्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले ठरते, ज्यांना विज्ञानामध्ये करिअर करायची इच्छा होती. पण, आर्थिक अडचणी किंवा कुटुंबीयांचा दबाव यांमुळे ते शक्य होऊ शकले नाही, असे तो म्हणाला.

चित्रांग मुरडिया लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने २०१८ मध्ये एमआयटीमधून भौतिकशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून पीएचडी केली. त्यांना भौतिकशास्त्राचा अभ्यास आणि संशोधनासाठी एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)सह इतर दोन परदेशी संस्थांमध्ये शिष्यवृत्ती मिळाली आहे.सध्या ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात क्वांटम ग्रॅव्हिटीमध्ये पोस्ट डॉक्टरलचे संशोधन करीत आहेत.

Story img Loader