Success Story: भारतामध्ये अनेक मोठमोठे उद्योजक आहेत, त्यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे भरत देसाई. आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवणारे देसाई १९७६ मध्ये रतन टाटा यांच्या टीसीएस कंपनीत काम करण्यासाठी अमेरिकेत गेले. परंतु, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून पत्नी नीरजा सेठीसह १९८० मध्ये दीड लाखांच्या गुंतवणुकीतून IT सल्लागार आणि आउटसोर्सिंग कंपनी Syntel सुरू केली.

परंतु, हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. एका खोलीच्या अपार्टमेंटमधून त्यांनी आपली कंपनी सुरू केली. प्रचंड मेहनतीच्या जोरावर आज ते १३,५०१ कोटींचे मालक आहेत.

भरत देसाई यांचे बालपण

भरत देसाई यांचा जन्म नोव्हेंबर १९५२ मध्ये केनियामध्ये झाला. ते भारतात लहानाचे मोठे झाले. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. १९७६ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि TCS मध्ये प्रोग्रामर म्हणून रुजू झाले. TCS मध्ये काम करत असताना त्यांची भेट नीरजा सेठीशी झाली, ज्यांच्याशी त्यांनी लग्न केले. यावेळी एका अपार्टमेंटमध्ये पती-पत्नी राहत होते. तेव्हाच त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. देसाई यांनी १९८० मध्ये त्यांची पत्नी नीरजा सेठी सोबत स्वतःची आयटी सल्लागार आणि आउटसोर्सिंग कंपनी सिंटेल सुरू केली. पहिल्या वर्षात सिंटेलने $३०,००० विक्री केली. २०१८ पर्यंत कंपनीचा महसूल $९०० दशलक्षपर्यंत वाढला. याकडे फ्रेंच IT कंपनी Atos SE चे लक्ष वेधले गेले.

हेही वाचा: Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्ब्सने देसाई यांच्या सिंटेलला ‘अमेरिकेच्या सर्वोत्कृष्ट २०० लहान कंपन्यांपैकी एक’ म्हणूनही मान्यता दिली आहे. यशस्वी व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी देसाई यांची कथा प्रेरणादायी आहे.