Success Story: राजस्थानमधील सरदारशहर या छोट्याशा शहरात राहणारे रघुनंदन सराफ यांनी त्यांच्या कुटुंबाच्या फर्निचर व्यवसायाचे रूपांतर इनसराफ या यशस्वी ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये केले. रघुनंदन यांनी २०१४ मध्ये फक्त ५०,००० रुपयांपासून व्यवसायाचा वारसा नव्या पद्धतीने चालवला आणि हा व्यवसाय आता करोडोंच्या घरात पोहोचवला.

रघुनंदन सराफचे वडील आणि काका यांनी मिळून सराफ फर्निचर सुरू केले. ते भारताच्या वेगवेगळ्या भागात फर्निचर विकायचे. १९९८ पर्यंत त्यांनी निर्यातदेखील सुरू केली होती. ते सरदारशहरमधील एका छोट्या दुकानातून त्यांचा व्यवसाय चालवायचे. २०१४ मध्ये रघुनंदन यांनी ऑनलाइन विक्री सुरू करून व्यवसाय पूर्णपणे बदलला. त्यांनी फक्त ५०,००० रुपये गुंतवून वेबसाइट बनवली आणि ऑनलाइन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, परंतु हळूहळू या ऑनलाइन व्यवसायाने प्रगती सुरू केली.

इनसराफ फर्निचर कंपनी रोझवुड लाकडापासून फर्निचर बनवते. २०१७ मध्ये इनसराफने दिवे आणि झुंबर विकण्यासही सुरुवात केली. त्यांची मुख्य उत्पादने फर्निचर, लाईटिंग, रग्ज आणि कार्पेट आहेत. कंपनी बुकशेल्फ, बॉक्स, कन्सोल, टेबल, ड्रेसर, गार्डन फर्निचर, होम टेम्पल, आरसे, टीव्ही युनिट्स, लाकडी बेड, साइड टेबल, बार कॅबिनेट, साइडबोर्ड, किचन कॅबिनेट, सोफा सेट, कॉफी टेबल, डेस्क आणि वॉर्डरोबदेखील विकते.

ऑनलाइन व्यवसाय सुरू करताना अडचणी

रघुनंदन सराफचा प्रवास सोपा नव्हता. सरदारशहर हे एक लहान शहर असल्याने, तिथे चांगल्या लॉजिस्टिक्स सुविधा नव्हत्या. त्यांनी लॉजिस्टिक्स कंपन्यांना तिथून काम सुरू करण्यास पटवून दिले. लॉजिस्टिक्स व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांना खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागली. तसेच ऑनलाइन ऑर्डर, विक्री आणि फर्निचरच्या सुरक्षित शिपिंगसाठी योग्य टीम तयार करणे यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागली. जेव्हा वेबसाइट सुरू झाली तेव्हा रघुनंदन यांनी सुमारे २,५०० उत्पादने अपलोड केली होती. आता त्यांच्या वेबसाइटवर ६,००० हून अधिक उत्पादने आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रघुनंदन यांचे शिक्षण

रघुनंदन सरदारशहरमधील एका स्थानिक शाळेत सहावीपर्यंत शिकले. सातवीपासून ते जयपूरमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. २००४ मध्ये तेथून ते बारावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून २००९ मध्ये ग्लोबल बिझनेस ऑपरेशन्समध्ये एमबीए केले.