भारतातील तरुण प्रथम सरकारी नोकऱ्यांकडे धाव घेतात. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. पण त्यांना हे समजून घ्यायला हवे की सरकारकडे तेवढ्या नोकऱ्या नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला वेळेत चांगली खाजगी नोकरी मिळाली तर तुमचा पगार आणि जीवनशैली सरकारी नोकरीपेक्षा कमी होणार नाही. पण आता प्रश्न पडतो की ही खाजगी नोकरी मिळणार कुठून? आम्ही तुम्हाला आज याबाबतच सांगणार आहोत. या लेखात, आम्ही तुम्हाला अशाच काही जॉब वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता आणि विनामूल्य चांगली खाजगी नोकरी शोधू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिंकडिन (linkedin.com)

तुम्ही खाजगी नोकरीच्या शोधात असाल तर लिंकडिन डॉट कॉम तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथे तुम्ही मोफत नोंदणी करू शकता. येथे तुम्हाला ज्या फील्डमध्ये नोकरी करायची आहे ते निवडा, त्यानंतर तुम्हाला त्याच क्षेत्रातील रिक्त जागा वेबसाइटवर दिसतील. देशातील सर्व मोठ्या कंपन्या या वेबसाइटवर नोंदणीकृत आहेत, या सर्व कंपन्या त्यांच्या रिक्त जागा येथे अपडेट करतात. येथून तुम्ही या रिक्त पदांसाठी देखील अर्ज करू शकता.

नोकरी डॉटकॉम (Naukri.com)

Naukri.com ही भारतातील काही निवडक जॉब वेबसाइट्सपैकी एक आहे, ज्यावर तुम्ही विनामूल्य नोंदणी करून नोकरी मिळवू शकता. भारतातील करोडो लोकांनी येथे आपली नोंदणी केली आहे. या वेबसाइटवर देशातील सर्व मोठ्या खाजगी कंपन्यांच्या एचआरचे खाते देखील आहे, जे दररोज त्यांच्या जागेवरून येणाऱ्या रिक्त पदांशी संबंधित प्रत्येक अपडेट देत असतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नोकरी डॉटकॉमचे अॅपही इन्स्टॉल करू शकता, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोकऱ्यांशी संबंधित अपडेट्स मिळू शकतील.

( हे ही वाचा: NCRTC मध्ये नोकरीची संधी; १ लाख ८० हजारांपर्यंत असेल पगार, जाणून घ्या अर्ज कसा कराल)

टाइम्स जॉब्स डॉट कॉम (Times Jobs.com)

Times Jobs.com ही भारतीय नोकरीची वेबसाइट आहे. २००४ मध्ये ही लाँच केली गेली होती. भारतातील सर्व मोठमोठ्या कंपन्या या संकेतस्थळावर नोंदणीकृत आहेत आणि त्या त्यांच्या ठिकाणाहून येणाऱ्या रिक्त पदांची माहिती वेळोवेळी देत ​​असतात. ही वेबसाइट पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आपण त्यावर विश्वास ठेवू शकता. २५ दशलक्षाहून अधिक लोक या जॉब वेबसाइटशी संबंधित आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These online platforms provide good private jobs for free gps
First published on: 20-02-2023 at 20:01 IST