Mumbai Port Trust Recruitment 2024 : जर तुम्हाला मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत भरतीसाठी नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ५ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२४ साठी आवश्यक रिक्त पदे, पगार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे बरोबर घेऊन जायची याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्त पद – ‘उपमुख्य अभियंता’ {Deputy Chief Engineer (Civil)} या पदासाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पगार – निवड केलेल्या उमेदवारांना महिन्याला ८० हजार ते दोन लाख २० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.

उमेदवार या लिंकद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात…

लिंक – https://onlinevacancy.shipmin.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इच्छुक व पात्र उमेदवाराने त्यांच्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी “पोर्ट भवन, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१” या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

हेही वाचा…TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

कोणती महत्त्वाची कागदपत्रे बरोबर घेऊन जावीत?

उमेदवाराने सर्व प्रमाणपत्रांच्या छायाप्रती आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, भूतकालीन व वर्तमानकालीन कामाच्या अनुभवाचा पुरावा, दोन पासपोर्ट साईज फोटो बरोबर घेऊन येणे.

शैक्षणिक पात्रता आणि आणखी कोणती महत्त्वाची कागदपत्रे अर्जासाठी लागतील याची सविस्तर माहिती अधिसूचनेत जोडण्यात आली आहे; ती एकदा तपासून घ्यावी.

लिंक – https://onlinevacancy.shipmin.nic.in/home/dwnld_advt/360

या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai port trust bharti 2024 various vacant posts of deputy chief engineer job location is mumbai read all details asp
First published on: 06-05-2024 at 14:46 IST