UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याअंतर्गतच यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-४ (नीतिशास्त्र)साठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पनांचा अभ्यास आपण या लेखातून करू. मागील लेखातून आपण अभिवृत्ती म्हणजे काय? त्याची विशिष्ट्ये आणि त्याच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण अभिवृतीची निर्मिती आणि अभिवृत्तीच्या घटकांबाबत जाणून घेऊया.

हेही वाचा – UPSC-MPSC : अभिवृत्ती म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये आणि प्रकार कोणते?

Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : कसा असेल अर्थसंकल्प? निर्मला सीतारामण कधी पोहचणार संसदेत? जाणून घ्या हे मुद्दे
In depth and easy expert analysis of the budget from Loksatta this year as well
‘लोकसत्ता’कडून यंदाही अर्थसंकल्पाचा सखोल, सुलभ तज्ज्ञवेध!
husband, dowry death, wife, inheriting property
हुंडाबळीच्या दोषी पतीस पत्नीच्या मालमत्तेत वारसाहक्क मिळेल का?
Budget 2024 FM Nirmala Sitharaman
Budget 2024 : EV घेणे होणार स्वस्त, HRA, हेल्थ इन्श्यूरन्स आणि बरंच काही; आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार?
article about mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा – बुद्धिमत्ता चाचणी
pli scheme to boost job creation
‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी
Indian Army also has a suicide dron How will Nagastra 1 expand its power
भारतीय सैन्याकडेही आत्मघाती ड्रोन…‘नागास्त्र-१’ मुळे सामर्थ्य कसे विस्तारणार ?
Transit of Venus
शुक्र गोचर निर्माण करणार ‘मालव्य राजयोग, ‘या’ तीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, मिळेल अपार पैसा अन् सन्मान

अभिवृत्तीची निर्मिती :

अभिवृत्ती ही शिकली जाते, ती बनवता येते किंवा ती बदलता येते. साधारणपणे व्यक्तीच्या अभिवृत्तीचे मूळ हे त्याच्या शिक्षणात सापडते. अभिवृत्तीच्या निर्मितीचे साधारण दोन मार्ग आहेत. एक शास्त्रीय पद्धत, कृती पद्धत.

शास्त्रीय पद्धत : एखादी गोष्ट आपल्याला सातत्याने मिळत गेली, की आपल्याला त्याची सवय होते. मात्र, जर ती गोष्ट मिळण्यात एखादे व्यत्यय आले की आपल्याला त्याचा तिरस्कार व्हायला लागतो. उदा. एखादी व्यक्ती फळ खाते आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडते. त्यानंतर त्या फळाबद्दल त्या व्यक्तीच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होते.

कृती पद्धत : या पद्धतीत व्यक्तीची अभिवृत्ती ही एखाद्या कृतीद्वारे निर्मित होते. म्हणजे, बक्षिस किंवा शिक्षा मिळाल्यानंतर व्यक्तीची अभिवृत्ती निर्मित होऊ शकते. उदा. ‘अ’ व्यक्ती सातत्याने तिच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा अनादर करते. त्यामुळे अ व्यक्तीला शिक्षा केली जाते. त्यानंतर अ व्यक्ती त्या मोठ्या व्यक्तीचा आदर करते. म्हणजे कृतीद्वारे त्याची अभिवृत्ती बदलते.

हेही वाचा – UPSC-MPSC : नैतिकता म्हणजे काय? नीतिशास्त्राचे स्रोत कोणते?

अभिवृत्तीचे घटक

अभिवृत्तीचे साधारण तीन घटक असतात. १) विश्वास ( congnitive or Belief ) २) प्रभाव किंवा भावना ( Affection or Emotiona ) आणि ३) वर्तवणूक किंवा कृती ( Behavioral or Action Tendency ). प्रत्येक अभिवृत्तीमध्ये हे तीन घटक असले तरी, कोणतेही एक विशिष्ट अभिवृत्ती एक घटकापेक्षा दुसऱ्या घटकावर आधारित असू शकते. त्याला एबीसी मॉडेल असेही म्हणतात. समजा एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने भारतीय वन सेवेत स्वत:चे करिअर घडवण्याचा निर्णय घेतला, तर एबीसी मॉडेलनुसार,

प्रभाव हा घटक त्या तरुण किंवा तरुणीला भारतीय वन सेवेत करिअर करण्याचा विचार कसा वाटतो? असा प्रश्न विचारेल. म्हणजेच प्रभाव हा घटक आपल्याला एखाद्या विषयाबाबत काय वाटतं? याच्याशी संबंधित आहे. उदा. मला श्वानाची भिती वाटते.

विश्वास हा घटक त्या तरुण किंवा तरुणीला एकंदरित प्रशासकीय सेवेबाबत काय वाटतं? असा प्रश्न विचारेल. म्हणजे विश्वास हा घटक व्यक्तीचा एखाद्यावर असलेल्या विश्वासाशी संबंधित आहे. उदा. माझ्या मते श्वान हा धोकायक प्राणी आहे.

तर वर्तवणूक किंवा कृती हा घटक त्या तरुण किंवा तरुणीला खरंच भारतीय वन सेवेत करिअर करायचे का? असा प्रश्न विचारेल. म्हणजे. हा घटक व्यक्तीच्या कृतीशी संबंधित आहे. उदा. मला श्वान दिसला की त्याच्याजवळून जाण्याऐवजी १०० मी. दूरून जातो.