UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याअंतर्गतच यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-४ (नीतिशास्त्र)साठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पनांचा अभ्यास आपण या लेखातून करू. मागील लेखातून आपण नैतिकता म्हणजे काय? नीतिशास्त्राच्या स्रोत आणि नैतिकतेचे महत्त्व तसेच नीतिशास्त्राच्या शाखा आणि नैतिकतेसमोरील आव्हानांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण अभिवृत्ती म्हणजे काय? त्याची विशिष्ट्ये आणि त्याच्या प्रकारांबाबत जाणून घेऊया.

हेही वाचा – UPSC-MPSC : नीतिशास्त्राच्या शाखा अन् नैतिकतेसमोरील आव्हाने

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

अभिवृत्ती म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्रसंगी व्यक्त होताना त्याच्या मूल्यांचा केलेला वापर म्हणजे अभिवृती होय. सामान्यत, ‘लोक, वस्तू, घटना, क्रियाकलाप, कल्पना किंवा आपल्या सभोवताली असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचे सकारात्मक किंवा नाकारात्मक मूल्यांकन करणे म्हणजे अभिवृत्ती, अशी अभिवृत्तीची सोप्पी व्याख्या करता येईल. या जगात प्रत्येक व्यक्तीची विशेषता असते. त्यानुसार प्रत्येकाची अभिवृत्ती देखील वेगळी असू शकते. एकंदरितच अभिवृत्ती ही एकप्रकारे मानसिक रचना असून ते प्रोत्साहन आणि प्रतिसाद यांच्यातील एक मध्यस्थ चल आहे, असे म्हणता येईल.

अभिवृत्तीची वैशिष्ट्ये कोणती?

  • अभिवृत्तीमुळे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजण्यात मदत होते.
  • अभिवृत्ती शिकता येते. आपण अनादी काळापासून अभिवृत्ती शिकत आलो आहोत.
  • अभिवृत्ती ही सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थ असू शकते.
  • महत्त्वाचे म्हणजे अभिवृत्ती ही दीर्घकाळ टिकून राहते तसेच काळानुरूप सुसंगत राहते.
  • अभिवृत्ती ही व्यक्तीमध्ये बदल घडवते. तसेच भावनिक अस्थितरता कमी करण्यास मदत करते.
  • अभिवृत्ती ही मुल्यांकनात्मक असते, कारण ती व्यक्तीच्या स्वभाव किंवा वर्तनाशी जोडलेली असते.
  • अभिवृत्ती ही व्यक्तीनिष्ठ असून ती प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. उदा. कोविडदरम्यान लॉकडाऊन घोषित करावा की नाही, यासंदर्भात दोन व्यक्तींची अभिवृत्ती ही वेगळी असू शकते.

एकंदरित अभिवृत्ती ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य असतो, असे म्हणता येईल.

अभिवृत्ती, विश्वास आणि मूल्ये यांच्यातील फरक काय?

अभिवृत्ती, विश्वास आणि मूल्ये यांच्यात फारसा फरक नसला, तरी या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अभिवृत्ती ही एखाद्या विशिष्ट विषयासंदर्भात असणारा दृष्टीकोन, त्यावरील मत आणि त्यासंदर्भातील विचारांचा संच म्हणजे अभिवृत्ती होय. तर अभिवृत्तीतील संस्थात्मक स्वरुप म्हणजे विश्वास होय. मुळात अभिवृत्तीवरून विश्वासाची निर्मिती होते. उदा. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवतो. कारण लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यात तुलना करतो. त्यामुळे लोकशाहीबाबत आपली सकारात्मक अभिवृत्ती तयार होते. याबरोबरच मूल्ये ही अभिवृत्ती आणि विश्वासाचाच एक घटक असतात. ती आपल्याला निवडीचे स्वातंत्र देत नाही. एखाद्या वस्तू किंवा विषयावरील घट्ट विश्वास मूल्यांमध्ये परावर्तीत होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : नैतिकता म्हणजे काय? नीतिशास्त्राचे स्रोत कोणते?

अभिवृत्तीचे प्रकार

अभिवृत्तीचे साधारण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्पष्ट अभिवृत्ती आणि दुसरं म्हणजे अव्यक्त अभिवृत्ती.

स्पष्ट अभिवृत्ती : स्पष्ट अभिवृत्तीत व्यक्तीला त्याच्या अभिवृत्तीची जाणीव असते. ही अभिवृत्ती जाणीवपूर्वक तयार होते. तसेच ती कमी उत्स्फूर्त असते. स्पष्ट अभिवृत्ती ही मूल्ये, विश्वास आणि इच्छित प्रतिसाद प्रतिबिंबित करते.

अव्यक्त अभिवृत्ती : अव्यक्त अभिवृत्तीत व्यक्तीला त्याच्या अभिवृत्तीची जाणीव नसते. ही एकप्रकारे अवचेतन अभिवृत्ती असते तसेच ती अधिक उत्स्फूर्त असते. अव्यक्त अभिवृत्ती ही सामाजिक अनुकूलनावर आधारित अनुभव प्रतिबिंबित करते.