सागर भस्मे

मागील लेखातून आपण सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण पठार आणि त्याच्या प्रकारांबाबत जाणून घेऊया. जगातील बहुतेक पठारांची निर्मिती ही भू- हालचालीमुळे झालेली आहे. भू हालचालींमुळे समुद्राचा तळभाग किंवा भूमिखंडांचा एखादा भाग उंचावून पठारांची निर्मिती होते. सभोवतालच्या सखल प्रदेशापेक्षा उंच, विस्तृत आणि जवळपास सपाट अशी भूरचनेची वैशिष्ट्य आहे. त्याची उंची ३०० ते ९०० मीटरच्या दरम्यान असते; पण काही पठारे यापेक्षाही बऱ्याच जास्त उंचीची असतात. उदाहरणार्थ, आशियातील तिबेटचे पठार, दक्षिण अमेरिकेतील बोलेव्हियाचे पठार यांची उंची समुद्रसपाटीपासून ३,६०० मीटरपेक्षाही जास्त आहे. भूपृष्ठाचा विस्तीर्ण भाग पठारांनी व्यापलेला असतो. उदाहरणार्थ, दक्खनचे पठार, आफ्रिकेचा पठारी प्रदेश.

Ayurvedic Remedies Swarna Bhasma
स्वर्ण भस्म किंवा सोन्याच्या तुपाचं सेवन का आहे फायद्याचं? आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलं खरं तूप कसं ओळखायचं?
covid new variant surge
करोनाच्या नव्या प्रकारांचा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये धुमाकूळ; भारतातील सद्यपरिस्थिती काय?
To avoid workplace stress career
ताणाची उलघड: कामाच्या ठिकाणी येणारा ताण टाळण्यासाठी…
mumbra Killing of young woman
ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या
thane police registers case over dog torture under old criminal law
ठाण्यातील श्वानावरील अत्याचारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल;जुन्या कलमानुसार ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला
Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
Hathras stampede kills over 100 Why stampedes take place
Hathras Stampede: चेंगराचेंगरी कशी टाळता येऊ शकते?
car insurance
पावसाच्या पाण्यामुळे कारचे नुकसान झाल्यास कोणत्या प्रकारचा विमा तुमचे पैसे वाचवेल माहितीये? घ्या जाणून…

हेही वाचा – UPSC-MPSC : वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?

पठारांच्या कडा तीव्र उताराच्या असतात. बाह्यशक्तीमुळे त्या बऱ्याच झिजलेल्या असतात. भूअंतर्गत खडकांचे आडवे थर बराच काळपर्यंत स्थिर राहिले असतील तर पठारांचा पृष्ठभाग समान उंचीचा राहतो. अशा पठारांच्या निर्मितीचे कारण हे उभ्या पातळीतील भू-हालचालींमुळे प्रदेश उंचावणे असते. पण आडव्या स्थितितील भूअंतर्गत खडकांचे स्तर हे नेहमीच त्याचे कारण नसते. भूप्रदेश उंचावून पठारांची निर्मिती होण्यापूर्वी कललेली व भू-हालचाली झालेली पठारे सतत बाह्यशक्तीच्या विदारण कार्यामुळे सपाट होऊ शकतात. अनेक वेळा नद्या व जलप्रवाह पठारांवर खोल दऱ्यांची निर्मिती करतात व त्याचे समतल भूपृष्ठाचे स्वरूप नष्ट करतात.

पठारांचे प्रकार ( Types of plateaus )

पठारांचे प्रकार किंवा वर्गीकरण हे त्यांच्या स्थितीवरून किंवा निर्मितीनुसार खालील प्रकारे केली जाते.

  • पर्वतांतर्गत पठारे
  • पर्वतपदीय पठारे
  • खंडीय पठारे

पर्वतांतर्गत पठारे : अशा पठारांना पर्वतांतर्गत पठारे म्हणण्याचे कारण ती अंशत: किंवा संपूर्णत: पर्वतरांगांनी वेढलेली असतात. जगातील सर्वांत उंच व विस्तीर्ण पठारे या प्रकारची आहेत. उदाहरणार्थ- तिबेटचे पठार, मंगोलियाचे पठार, मेक्झिको व बोलिव्हियाचे पठार.

पर्वतपदीय पठारे : ही पठारे पर्वतांच्या पायथ्यालगत तयार होत असतात. त्यांच्या एका बाजूस पर्वत तर दुसऱ्या बाजूस समुद्र किंवा मैदानी प्रदेश असतात. दक्षिण अमेरिकेतील पॅरागोनियाच्या पठाराच्या एका बाजूस अटलांटिक महासागर आहे, तर दुसऱ्या अंगास अँडिज पर्वत आहे. उत्तर अमेरिकेतील अपेलेशियन पठाराच्या पश्चिमेस अॅपेलेशियन पर्वत तर पूर्वेला अटलांटिकचे किनारी मैदान आहे.

खंडीय पठारे : ही पठारे खंडाचा मोठा प्रदेश व्यापत असून अतिशय विस्तृत असतात. सखल मैदाने किंवा समुद्रकिनाऱ्यापासून या पठारांची उंची एकदम वाढलेली असते. उदाहरणार्थ- दक्षिण आफ्रिकेचे पठार, पश्चिम ऑस्ट्रेलियन पठार, छोटा नागपूर व शिलाँगचे पठार, दक्खनचे पठार, इत्यादी. काही वेळेस एखाद्या मैदानाची किंवा सखल प्रदेशाची भू-हालचालींमुळे उंची वाढून पठारांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, कैमूरचे पठार, रोहटाज, रांची व म्हैसूरचे पठार ही अशा प्रकारच्या पठारांची उदाहरणे होत. पश्चिम पाकिस्तानातील पोटवारचे पठार हे सुद्धा खंडीय पठाराची उदाहरणे आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे भूरूपे कशी तयार होतात?

पठाराची निर्मिती ही लाव्हारसामुळेदेखील होत असते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारस सभोवताल उताराच्या दिशांनी वाहत जाऊन त्याचे घनीभवन झाल्यावर तो पसरलेल्या प्रदेशाची उंची वाढून पठाराची निर्मिती होते. भारतातील दक्खनचे व माळव्याचे पठार, संयुक्त संस्थानांच्या वायव्य भागातील कोलंबियाचे पठार ही अशा प्रकारची लाव्हानिर्मित पठारे आहेत. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळेदेखील पठारांची निर्मिती होते. आशियातील गोवीच्या वाळवंटातून वाऱ्याबरोवर वाहत येणाऱ्या पिवळ्या लोएस मातीचे संचयन उत्तर चीनमध्ये होऊन लोएस पठार निर्माण झाले आहे.