UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन ‘सर्पविनाश’,

भारतीय लष्कराने जम्मू कश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन ‘सर्वशक्ती’ सुरू केले असून या ऑपरेशन अंतर्गत पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहेत. या भागांतील दहशतवादी कारवाया वाढवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावणे हा या ऑपरेशनमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. भारतीय लष्कराने ऑपरेशन ‘सर्वशक्ती’ सुरु केल्यानंतर अनेकांना २००३ साली याच भागात झालेल्या ऑपरेशन ‘सर्पविनाश’ची आठवण झाली.

toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषयी यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील भारतातील अंतर्गत सुरक्षा आव्हाने, अतिरेकी, दहशतवाद, मनी लाँडरिंग या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे ऑपरेशन ‘सर्वशक्ती’ आणि ‘सर्पविनाश’ नेमके काय आहे? ते का सुरु करण्यात आले? ऑपरेशन ‘सर्पविनाश’ पूर्वीची परिस्थिती नेमकी कशी होती? आणि ऑपरेशन ‘सर्पविनाश’चे परिणाम काय झाले? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

वर्ष २००३ च्या सुरुवातील जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल भागात भारतीय सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी यांच्या मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्या. या चकमकीनंतर भारतीय लष्कराने एप्रिल २००३ मध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ‘सर्पविनाश’ सुरू केले होते. जवळपास तीन महिने चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराने पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेत असलेल्या घनदाट जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावणे हा भारतीय लष्कराचा उद्देश होता. महत्त्वाचे म्हणजे या ऑपरेशन दरम्यान १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. तसेच या ऑपरेशनमध्ये १० हजार सैनिक सहभागी होते. या ऑपरेशनमध्ये मोठ्या संख्येने एके-४७ बंदूका, हातगोळे, औषधी, संप्रेषण साधने आणि जवळपास ७ हजार किलो धान्य जप्त करण्यात आले होते. तसेच ४० ते ५० दहशतवादी तळही उध्दवस्त करण्यात आला होती.

सुरक्षेच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे का?

हा भाग मेंढरच्या दक्षिणेला पीर पंजाल पर्वतरांगेकडे हिलकाका मार्गादरम्यान येतो. हा भाग अतिशय छोटा असून नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीर खोऱ्यात दाखल होण्यासाठी हा अतिशय सोपा मार्ग आहे. दहशतवाद्यांकडून या भागात तळ उभारले जातात, त्याचं कारण म्हणजे या भागावर ताबा मिळवल्यास सहजपणे काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करता येते. तसेच भागात असलेल्या घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगामुळे या संपूर्ण भागावर लक्ष ठेवणे सोपे जाते. याशिवाय भारतीय लष्कराने एखादी मोहीम राबवल्यास सहजपणे नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल होता येते. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) आरोग्य विमा धारकांसाठी १०० टक्के ‘कॅशलेस’ उपचाराची पद्धत

आरोग्य विमा कंपन्यांनी २५ जानेवारीपासून देशभरात १०० टक्के कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

‘Cashless Everywhere’ प्रणाली अंतर्गत विमाधारक कोणतीही रक्कम न भरता त्यांनी निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. याचा अर्थ आता विमाधारकाला कोणतेही आगाऊ पैसे न भरता कोणत्याही रुग्णालयात दाखल होता येणार आहे आणि विमा कंपन्या डिस्चार्जच्या दिवशी Cashless Everywhere च्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण शुल्क भरतील. जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) च्या या नव्या उपक्रमानुसार, कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाला त्याच्या विमा कंपनीला किमान ४८ तास अगोदर कळवावे लागणार आहे. सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्या एकत्रितपणे सर्वत्र कॅशलेसची सुविधा सुरू करीत आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.