भारतीय लष्कराने जम्मू कश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन ‘सर्वशक्ती’ सुरू केले असून या ऑपरेशन अंतर्गत पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहेत. या भागांतील दहशतवादी कारवाया वाढवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावणे हा या ऑपरेशनमागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

मागील काही दिवसांत या भागात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले असून हल्ल्यांमध्ये २० जवान शहीद झाले. दरम्यान, भारतीय लष्कराने ऑपरेशन ‘सर्वशक्ती’ सुरु केल्यानंतर अनेकांना २००३ साली याच भागात झालेल्या ऑपरेशन ‘सर्पविनाश’ची आठवण झाली. हे ऑपरेशन ‘सर्पविनाश’ नेमकं होतं? त्यावेळेस परिस्थिती नेमकी कशी होती? आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा का? याविषयी जाणून घेऊया.

MDH Everest Masala Controversy Modi Sarkar Spice Board Big Decision
MDH, Everest मसाल्यांवर विदेशात बंदी घातल्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय; मसाला मंडळाने काय सांगितलं?
shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत

हेही वाचा – मणिपूरमध्ये मंत्री आणि आमदारांनाही उपस्थित राहण्याचा दबाव निर्माण करणारा मैतेई समाजाचा ‘तो’ कट्टरपंथी गट नेमका कोणता?

ऑपरेशन ‘सर्पविनाश’ नेमके काय होते?

वर्ष २००३ च्या सुरुवातील जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल भागात भारतीय सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी यांच्या मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्या. या चकमकीनंतर भारतीय लष्कराने एप्रिल २००३ मध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ‘सर्पविनाश’ सुरू केले होते. जवळपास तीन महिने चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराने पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेत असलेल्या घनदाट जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावणे हा भारतीय लष्कराचा उद्देश होता.

महत्त्वाचे म्हणजे या ऑपरेशन दरम्यान १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. तसेच या ऑपरेशनमध्ये १० हजार सैनिक सहभागी होते. या ऑपरेशनमध्ये मोठ्या संख्येने एके-४७ बंदूका, हातगोळे, औषधी, संप्रेषण साधने आणि जवळपास ७ हजार किलो धान्य जप्त करण्यात आले होते. तसेच ४० ते ५० दहशतवादी तळही उध्दवस्त करण्यात आले होती.

ऑपरेशन ‘सर्पविनाश’ पूर्वीची परिस्थिती नेमकी कशी होती?

नुकतेच झालेले कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्याच्या जखमा ताज्या होत्या. तसेच भारतीय सैन्याने नुकताच ऑपरेशन ‘पराक्रम’ सुरू केले होते. अशावेळी २००३ च्या सुरुवातीला ३०० पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू काश्मीरमधील पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये दाखल झाल्याची गुप्त माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. हे दहशतवादी विविध संघटनांशी संबंधित होते. या माहितीच्या आधारे लष्कराने योजना आखून ऑपरेशन ‘सर्पविनाश’ सुरू केले.

सुरक्षेच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे का?

हा भाग मेंढरच्या दक्षिणेला पीर पंजाल पर्वतरांगेकडे हिलकाका मार्गादरम्यान येतो. हा भाग अतिशय छोटा असून नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीर खोऱ्यात दाखल होण्यासाठी हा अतिशय सोपा मार्ग आहे. दहशतवाद्यांकडून या भागात तळ उभारले जातात, त्याचं कारण म्हणजे या भागावर ताबा मिळवल्यास सहजपणे काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करता येते. तसेच भागात असलेल्या घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगामुळे या संपूर्ण भागावर लक्ष ठेवणे सोपे जाते. याशिवाय भारतीय लष्कराने एखादी मोहीम राबवल्यास सहजपणे नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल होता येते. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – विश्लेषण : भारतात प्रजासत्ताक दिनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? ही प्रक्रिया कधी सुरू होते?

ऑपरेशन ‘सर्पविनाश’चे परिणाम काय झाले?

‘ऑपरेशन सर्पविनाश’मुळे या भागातील सर्व दहशतवादी तळे उध्दवस्त करण्यात आली. परिणामत: वर्ष २०१७-१८ पर्यंत या भागात शांतता होती. मात्र २०२१ पासून या भागात पुन्हा सुरक्षा दलांवर हल्ले सुरू झाले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराने ‘ऑपरशेन सर्वशक्ती’ सुरू केले आहे.