जीवशास्त्र आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्हींचा संगम असलेला अभ्यासक्रम म्हणजे बायोइन्फर्मेटिक्स. बायोइन्फर्मेटिक्स ही या जैवतंत्रज्ञानाचीच शाखा आहे. सध्या या शाखेत खूप संशोधन होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने जीवशास्त्रीय माहितीचे पृथ्थकरण करणे आणि माहितीच्या साठवणुकीबरोबरच ही माहिती पडताळून पाहाणे ही कामे तज्ञांकडून यात केली जातात.
ऊर्जा, पर्यावरण, कृषिक्षेत्र, आरोग्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये बायोइन्फर्मेटिक्स तज्ज्ञांची गरज भासते. बारावी झाल्यानंतर तुम्ही ही शाखा निवडू शकता. बारावीला जीवशास्त्र विषय घेतलेला पाहिजे.
आपल्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानातूनच शेतीत वापरले जाणारे बियाणे तयार केले जात आहे.
या बियाणांनी आपल्या शेतीत क्रांती केली आहे तसेच शेती व्यवसायाचे स्वरूप पार बदलून टाकले आहे.
तसेच इतर क्षेत्रातही बायोइन्फर्मेटिक्स या शाखेने क्रांती केली आहे.

‘बायोइन्फर्मेटिक्स’मध्ये करियर :
विविध औषध कंपन्या, हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा, बीयर कंपन्या या क्षेत्रात नोकरी आहे.
तसेच नेट ही परीक्षा देऊन प्राध्यापक होता येईल आणि विद्यापीठ, महाविद्यालये इथे शिकवू शकता.
वैद्यकीय महाविद्यालये, हॉस्पिटल्स या ठिकाणी बायोइन्फर्मेटिक्स तज्ज्ञांची आवश्यकता भासते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोकऱ्यांप्रमाणे भारी पगाराच्या नोकऱ्या या शाखेतील पदवीधरांना मिळतात.
(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

बायोइन्फर्मेटिक्स अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शिक्षण संस्था
१. बायोइन्फर्मेटिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, नोईडा
२. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी) दिल्ली
३. पुणे विद्यापीठ
४. युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद.
५. इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फर्मेटिक्स अँड अप्लाईड बायोटेक्नॉलॉजी, बंगळुरू (आयबीएबी)
६. पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढ http://www.puchd.ac.in
७ . पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर, http://www.prsu.ac.in
प्रा. योगेश हांडगे