प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख :

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

केम्ब्रिज विद्यापीठाला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. इसवी सन १२०९ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ इंग्रजी भाषेमध्ये सर्व अभ्यासक्रम चालवणाऱ्या विद्यापीठांपैकी दुसरे जुने विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार केम्ब्रिज हे जगातले सहाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. ऑक्सफर्डमधील काही विद्वानांनी झालेल्या तत्कालीन वादामुळे बाहेर पडून स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले, ते विद्यापीठ म्हणजेच केम्ब्रिज. इंग्लंडमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन्ही प्राचीन विद्यापीठांमध्ये कित्येक समान धागे आहेत. म्हणूनच अनेकदा या दोन्ही विद्यापीठांना ‘ऑक्सब्रिज’ असे संबोधण्यात येते. केम्ब्रिज हे शासकीय विद्यापीठ आहे. साहित्य व इंग्रही भाषा यासाठी जसे ऑक्सफर्डला ओळखले जाते तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी केम्ब्रिज विद्यापीठ ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये केम्ब्रिजला समाविष्ट करण्यात आले आहे. ‘फ्रॉम हिअर लाइट अ‍ॅण्ड सेक्रेड ड्रॉट्स’ हे केम्ब्रिज विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. केम्ब्रिज विद्यापीठ ३१ घटक महाविद्यालये आणि सहा प्रमुख शैक्षणिक विभाग मिळून बनलेले आहे. विद्यापीठातील ही सर्व महाविद्यालये स्वयंशासित असून प्रत्येक महाविद्यालय स्वत:च्या अंतर्गत शैक्षणिक व संशोधन रचना नियंत्रित करते.

इंग्लंडमध्ये असलेला केम्ब्रिज युनिव्हर्सिटी टाऊन हा विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस साधारणपणे सातशे एकर परिसरात पसरलेला आहे. याशिवाय इतर कॅम्पसमध्येसुद्धा विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये, निवासी व्यवस्था इत्यादी गोष्टी आहेत. सध्या केम्ब्रिजमध्ये जवळपास आठ हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास वीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

केम्ब्रिज विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. केम्ब्रिजमध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील आर्ट्स अ‍ॅण्ड ह्य़ुमॅनिटीज, ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, क्लिनिकल मेडिसिन, टेक्नॉलॉजी, बायोलॉजिकल सायन्सेस आणि फिजिकल सायन्सेस या सहा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील दीडशेहून अधिक पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

केम्ब्रिज विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात. ‘केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ हे जगातील सर्वात जुने असलेले प्रकाशनगृह खरेतर केम्ब्रिज विद्यापीठाद्वारे कार्यरत असलेला एक स्वतंत्र विभाग आहे.  हे नामांकित प्रकाशनगृह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विद्यापीठ प्रकाशनगृह आहे. केम्ब्रिजच्या ग्रंथालयांमध्ये एकूण दीड कोटी पुस्तके आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाकडून एकूण आठ सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संग्रहालयांचे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये प्रसिद्ध फिट्झविल्यम संग्रहालयाचा समावेश आहे.

वैशिष्टय़

शैक्षणिक उत्कृष्टता आणि पारंपारिक विद्वत्तापूर्ण मूल्ये असल्यामुळे केम्ब्रिज विद्यापीठ शैक्षणिक विश्वात अत्यंत मानाचे स्थान पटकावून आहे. यामुळेच शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन यासाठी जगभरातील सर्व बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम राजकारणी, वकील, तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ, निर्माण केले आहेत. यामध्ये महान शास्त्रज्ञ न्यूटन, डार्वनि, बेकन, स्टीफन हॉकिंग्ज, क्रीक-वॅट्सन, जे.जे.थॉमसन, जेम्स चाडविक यांसारख्या महान संशोधकांपासून ते लॉर्ड बायरन, ख्रिस्तोफर मार्लो, थॉमस नॅश अगदी अलीकडील सलमान रश्दी यांसारख्या साहित्यिकांचा समावेश आहे. इंग्लंडमधील पंधरा माजी पंतप्रधान या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी होते. जगातील विविध देशांचे नेतृत्व ज्यांनी केले आहे किंवा करत आहेत त्यापैकी बहुतेक नेते या विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत.

आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण ११८ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि सहा टय़ुिरग पुरस्कार विजेते आहेत.

संकेतस्थळ : https://www.cam.ac.uk/