News Flash

पर्यटनाचा विकास – महाभ्रमण

अद्यापही या महाभ्रमणसाठी नोंदणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वाव आहे.

पूर्वीच्या काळी केवळ देवदर्शनापुरते असणाऱ्या पर्यटनाच्या आता कक्षा एवढय़ा विस्तारल्या आहेत की, ‘पर्यटनाला गगन ठेंगणे’ असेच म्हणावे लागेल. पावसाळी, उन्हाळी व हिवाळी असे तीन मुख्य विभागात सध्याचं पर्यटन विस्तारल्याचं दिसतंय. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी होणारी गर्दी, गिरीभ्रमंती, अभयारण्यातील फेरफटका, गिर्यारोहणाची युवक वर्गात मोठी क्रेझ निर्माण झाली. कृषिपर्यटन, साहसी पर्यटन आदी पर्यटनाच्या नवीन संकल्पना जनमानसात दृढ व्हाव्यात आणि या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच लाभार्थ्यांचा आर्थिक विकास व्हावा, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळामार्फत ‘महाभ्रमण’ योजना राबविण्यात येत आहे.

  • पर्यटनाची एखादी नवीन संकल्पना राबवून या दृष्टिकोनातून पर्यटकांना सर्व सुविधा पुरविणे हा महाभ्रमण योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • महाराष्ट्राच्या मातीची, संस्कृतीची व परंपरेची विविधांगी ओळख व्हावी आणि पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळी अनुभूती पर्यटकांना मिळावी, यासाठी महामंडळाने योजना सुरू केली आहे. पुणे जिल्ह्य़ात जुन्नर, मुळशी, मावळ या ठिकाणी या योजनेचे परवानाधारक लाभार्थी आहेत. तथापि अद्यापही या महाभ्रमणसाठी नोंदणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वाव आहे.
  • महाराष्ट्रात काही शेतकरी, खासगी उद्योजक तसेच अशासकीय संस्था पर्यटनाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना, उद्योजकांना व अशासकीय संस्थांना एका छत्राखाली (महाभ्रमण) आणून त्यांच्या प्रयत्नांची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्रचार-प्रसार करणे व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटनाला एक वेगळे परिमाण प्राप्त करून देणे यासाठी महाभ्रमण संकल्पना सर्वत्र रुजत आहे.

महाभ्रमण योजनेखाली नोंदणीसाठी आवश्यक बाबी

  • विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज
  • जेथे योजना राबविली जाते त्या जागेचे मालकीपत्र अथवा वापर परवाना वा मालकाचे संमतीपत्र (आवश्यक असेल तेथे)
  • योजनेची माहिती व वैशिष्टय़े (पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळे) व रंगीत छायाचित्रे
  • अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मध्यवर्ती इमारत, पुणे-०१, दूरध्वनी क्र. ०२०/२६१२६८६७, २६१२८१६९, फॅक्स- २०-२६११९४३४ येथे संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:36 am

Web Title: development in tourism
Next Stories
1 नोकरीची संधी
2 नर्सिग विषयातील विशेष अभ्यासक्रम
3 यूपीएससीची तयारी : सीसॅट – मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी