News Flash

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

के. सी. महिन्द्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे यावर्षी दहावी व बारावी उत्तीर्ण होऊन पॉलिटेक्निकमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

* योजनेचा तपशील –

महिन्द्रा अखिल भारतीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्या ५०० गरजू व गुणवान विद्यार्थ्यांना त्यांच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ३ वर्षे कालावधीसाठी वार्षिक १०,००० रु. ची शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.

* आवश्यक पात्रता –

अर्जदारांनी मान्यताप्राप्त शाळेतून १० वी किंवा १२ वीची परीक्षा ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी पॉलिटेक्निकमधील पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.

* विशेष सूचना –

पात्रताधारक अर्जदारांमधून विद्यार्थिनी उमेदवार, कमी मिळकत असणाऱ्या कुटुंबातील अर्जदार, दिव्यांगजन व सैनिकांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येईल.

* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क –

योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली केसी महिन्द्रा ट्रस्टची जाहिरात पाहावी. अथवा महिन्द्रा ट्रस्टच्या   https://www. kcmet. org/

what-we-do-Scholarship-Grants.aspx  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख –

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील कागदपत्रांसह असणारे अर्ज के. सी. महिन्द्रा एज्युकेशन ट्रस्ट, सेसिल कोर्ट, ३ रा मजला, रिगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४००००१

या पत्त्यावर ५ ऑगस्ट २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

– द. वा. आंबुलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 3:15 am

Web Title: scholarship for polytechnic diploma course
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : मनुष्यबळ विकास व्यावसायिक शिक्षण व ग्रामविकास घटक
2 ‘प्रयोग’ शाळा : अपूर्णाकांचा  पूर्ण अभ्यास
3 यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत
Just Now!
X