भारतीय मन उत्सवी आहे. आपल्याला सण, उत्सव आवडतातच, पण काळानुसार प्रत्येक सणाचं स्वरूप, तो साजरा करायची पद्धत, आनंदाच्या संकल्पना बदलत जातात.
दसरा असो की दिवाळी काळानुसार ती साजरा करण्याच्या पद्धतीत आताही खूप फरक पडलाय. पूर्वी दिवाळीत आकाशकंदील घरीच करण्याची प्रथा होती, रांगोळ्याही कसल्याही कागदांचा वापर न करता घातल्या जायच्या आणि पदार्थ तर स्वत:च्या हातचेच, असा आग्रह असायचा. अलीकडे मात्र वेळ कुणाकडे आहे, म्हणत माणसांची व्यस्तता त्यांना एकमेकांकडे येण्यास अटकाव करू लागलीय, सणाचं व्यापारीकरण होऊ लागलंय, तरीही सण साजरे होत आहेतच.
येत्या दिवाळीच्या निमित्ताने याचा धांडोळा आपण घेऊ या. कसं बदलत गेलं दिवाळीचं स्वरूप? आम्हाला लिहा, तुम्ही तुमच्या लहानपणी अनुभवलेली दिवाळी आणि आता नातवंडांच्या काळातली दिवाळी – काय फरक जाणवतोय तुम्हाला? त्यामागच्या दृष्टिकोनात  फरक जाणवतोय की नात्यांच्या गरजा काही वेगळीच मागणी करताहेत? तुमची पिढी, तुमच्या मुलांची आणि आता नातवंडांची पिढी या तीन पिढय़ांची दिवाळी साजरी करण्यात नेमका काय फरक जाणवतोय तुम्हाला? हा अनुभव २००-२५० शब्दांत पाठवा. तुमच्या लहानपणीच्या दिवाळीचं फार रसभरीत वर्णन नको, तर बदलत चाललेली दृष्टी, आनंद उपभोगाच्या संकल्पनांतला तुम्हाला जाणवणारा बदल यात मांडू शकता. अट फक्त एकच, तुम्ही आजी-आजोबा असायला हवेत आणि वयाची पासष्टी पार केलेली हवी. त्या वेळच्या किंवा अलीकडच्या दिवाळीतले काही फोटो असतील तर तेही नक्की पाठवा.
‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८,
टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे,
नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com