० १०-१५ दिवसांसाठी प्रवासाला जाणार असल्यास घराची दारे आणि खिडक्यांना जुने पेपर लावा, म्हणजे जास्त धूळ घरात येणार नाही. खिडक्यांना आतल्या बाजूने कडी लावून बंद करा.

० डायनिंग टेबल, खुच्र्या, सोफा यावर जुने पेपर लावून पूर्णत: झाकून टाका म्हणजे त्याचा धुळीपासून बचाव होईल.

० गाद्या, उशा, उशांच्या खोळी यांवर जुनी चादर पसरून घाला. त्यामुळे अंथरुणावर धूळ जमा होणार नाही.

० फ्रिज बंद करताना फ्रिजमधील सर्व वस्तू बाहेर काढून ठेवा व फ्रिज कोरडय़ा कपडय़ाने साफ करून घ्या. फ्रिज पूर्ण कोरडा करून बंद केल्यास त्यातून दरुगध येणार नाही. फ्रिज बंद करण्यापूर्वी त्यात खाण्याचा सोडा ठेवा तसेच पेपरचे बोळे करून ठेवा त्यामुळे फ्रिजमध्ये उरलेली आद्र्रता शोषली जाईल. नंतर फ्रिज बंद करून तो जुन्या कपडय़ाने झाकून टाका.

० सॉफ्ट टॉइज कपाटामध्ये ठेवा, स्टडी टेबल, सेटर टेबल, ड्रेसिंग टेबल यावर जुने कपडे टाकून झाकून घ्या.

० किचन ओटा व गॅस शेगडी यावर पेपर पसरून ठेवा.

० मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रिज यांचे प्लग काढून ठेवा. सिंक साफ करून त्याच्या पाइपमध्ये कीटकनाशक फवारा तसेच सिंकमध्ये नॅप्थलिन बॉल टाकून ठेवा.

० बाथरूम आणि कमोडमध्ये कीटकनाशक फवारा तसेच जाळीवर नॅप्थलीन बॉल टाकून ठेवा. स्नानासाठी वापरली जाणारी भांडी रिकामी करून जुन्या पेपरने झाकून ठेवा.

० घरातील मेन स्विच, पाण्याचा नळ बंद करा.

० घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक तास आधी हवे असलेले सर्व सामान घेतले असल्याची खात्री करून घ्या.

० प्रवासासाठी आवश्यक सामानाची यादी करा आणि त्यानुसार सामानाची बांधाबांध करा.

० आपल्याकडे सामानाचे किती नग आहेत आणि कोणी काय घ्यायचे हे ठरवून घ्या.

० सगळ्यात महत्त्वाचे बाहेर पडल्यावर लॅच, कुलूप नीट लागले असल्याची खात्री करून घ्या.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com