वय वर्षे १०५. अजूनही कार्यरत. वाटले ना आश्चर्य. मॅनोल दे ओलीवैरा हे १९०८ साली पोर्तुगालमध्ये जन्मले. आणि त्यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली १९२७ पासून. आज १०५ व्या वर्षीसुद्धा या आजोबांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. या आजोबांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
१९२७ ते १९४२ या कालावधीत मॅनोल यांनी ‘वर्ल्ड वॉर’, ‘फातिमा मिलाग्रोसा’, ‘अ कॅनाको दे लिसबोआ’ यासारखे लघुपट दिग्दíशत केले. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यातल्या सर्व लघुपटांत त्यांनी नाना प्रयोग केले. पण मॅनोल यांच्या चित्रपट करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पंचाहत्तरीनंतर. आणि ते होते असफल प्रेमाची अनुभूती दाखवणारे चित्रपट.
त्यानंतरचा म्हणजे १९९० पासून आतापर्यंतचा काळ हा त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला वाव देणारा ठरला. या दरम्यान त्यांनी अनेक आशयघन चित्रपट दिग्दíशत केले. २०१२ मध्ये काही दिवस रुग्णालयात संसर्गावर उपचार घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने हे १०३ वर्षांचे तरुण आजोबा कामाला लागले आणि चक्क त्यांनी ‘अ द चर्च ऑफ द डेव्हिल’ या चित्रपटाचे कामदेखील केले. सध्या ते ‘द ओल्ड रेस्टलो’ या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतलेले आहेत. सरकारकडून फंड मिळताच याही चित्रपटाचे काम पूर्ण करून २०१४ मध्ये तो प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे. आता बोला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आनंद साधना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film loving manol
First published on: 04-01-2014 at 06:18 IST