निसर्गाने प्रत्येक गोष्टीची उपलब्धता ऋ तूनुसार केलेली आहे, त्या सर्व गोष्टी त्या त्या ऋ तूमध्ये जरूर खाव्यात. ते त्या ऋ तूमध्ये अतिशय फायदेशीर असते. निसर्गानेच तशी सोय करून ठेवलेली आहे. उन्हाळ्यामध्ये मिळणारी फळे अशीच आपल्याला उष्णतेपासून वाचवतात. थंडावा देतात व उन्हाळ्यात होणाऱ्या विविध व्याधींपासूनही दूर ठेवतात. फक्त त्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे आहारात जरूर सेवन करावे.
कैरी : शरीरासाठी अतिशय थंड, विविध पदार्थ करून खाता येतात. उदाहरणार्थ कैरीचे पन्हे, छुंदा, डाळकैरी, कैरी कोशिंबीर इत्यादी. तोंडाला चव नसणाऱ्यांनी अवश्य कैरी खावी. भाज्यांमध्ये टाकून खाण्यासही हरकत नाही.

आंबा : कैरीपेक्षा उष्ण. पण ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पचण्यासाठी किंचित जड, आमरस खाण्यापेक्षा आंबा तसाच खाण्यावर जास्त भर द्यावा. विविध प्रकारच्या जंतुसंसर्गापासूनही बचाव होतो. कारण ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते.

कलिंगड : शरीराला थंडावा देते. पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतो. अस्थमा, कर्करोग, त्वचेचे विकार, उष्णतेच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयोगी. ‘अ’ जीवनसत्त्व आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळ्यामध्ये सद्यतर्पण म्हणजे लगेच आद्र्रता देणारे फळ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टरबूज : कलिंगडाप्रमाणेच शरीराला थंडावा देणारे फळ. पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. जीवनसत्त्व ‘अ’ व ‘क’ भरपूर प्रमाणात आहे. मधुमेह, स्थौल्य, उच्च रक्तदाब, हृदयाच्या तक्रारी, मासिक पाळीच्या तक्रारी, कॅन्सर इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयोगी. (क्रमश:)

– डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ