* नियमितपणे सकाळी केलेला व्यायाम फायदेशीर असतो. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढाच.* धावणे, जॉगिंग, दोरीच्या उडय़ा, जिन्यातून चढ-उतार, पोहणे, चालणे, सायकल चालवणे या प्रकारातून आपल्याला सहज-सोपे व्यायाम करता येतील.
* व्यायाम आनंददायी व उत्साहवर्धक होण्यासाठी एकटय़ाने व्यायाम करण्याऐवजी सोबत कुणी तरी असल्यास उत्तम.
* व्यायामाची सुरुवात ५ मिनिटांपासून करावी व नंतर हळूहळू वेळ वाढवीत न्यावी.
* व्यायाम करताना थकवा जाणवला किंवा शरीरात कुठे वेदना जाणवली तर व्यायाम तिथेच थांबवावा.
* ज्यांना इतर व्यायाम प्रकार कठीण वाटत असतील त्यांनी चालण्याचा व्यायाम करावा.
* व्यायामाला सुरुवात करताना शरीराला ताण देऊन स्नायू शिथिल करावते. चालण्याच्या व्यायामाला वॉर्मअप महत्त्वाचे आहे.
* चालताना घालण्याचे बूट वजनाला हलके व सल असावेत.
* चालताना डोळे व पाठ सरळ ठेवावी.
* चालताना पाय आपटल्यासारखे चालू नये.
* जास्त अंतर चालण्यासाठी लांब लांब पावले टाकू नये.
* हिरवळीवर उघडय़ा पावलांनी चालणे चांगले.
* चालताना चालण्याच्या लयीनुसार हात वर-खाली, गोलाकार फिरवावा.
* व्यायाम दमट वातावरणात करू नये.
* घरात व्यायाम करीत असाल तर पंखा व एसी बंद करावा.
* व्यायाम करण्यापूर्वी व व्यायाम झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com

More Stories onजिमGYM
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for gym workout
First published on: 11-04-2015 at 01:01 IST