पश्चिम बंगालमधील नडिया जिल्ह्य़ात एका ख्रिश्चन शाळेत दरोडेखोरांनी वयस्कर ननवर (जोगीण) सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून दरोडेखोरांनी बारा लाखांची लूटही केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्णब घोष यांनी सांगितले की, या गुन्ह्य़ाबाबत सात ते आठ जणांना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे त्यात कोण सामील होते याची खातरजमा करण्यात येत आहे. ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यापैकी कुणी चित्रफितीतील व्यक्तींशी मिळतेजुळते आहे का याचा तपास केला जात आहे.
या गुन्हयात सामील असलेल्यांना पकडण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जात असून पोलिसांनी जी माहिती जमा केली आहे ती तपासात अडथळे येऊ नयेत या कारणास्तव दिली जाणार नाही.
सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिले असता त्यात चार व्यक्ती या गुन्ह्य़ात सामील असल्याचे दिसतात. दरम्यान, पोलिस निरीक्षकांनी या गुन्ह्य़ातील आरोपींबाबत विश्वासार्ह माहिती देणारांसाठी १ लाख रूपये इनाम जाहीर केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 12:11 pm