25 October 2020

News Flash

सार्वजनिक शौचालयात जात असताना अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार

नवी दिल्लीतील धक्कादायक घटना, दोन्ही आरोपींना अटक

नवी दिल्लीत घराबाहेरील सार्वजिनक शौचालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री जे.जे. कॉलनी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ पावलं उचलत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यातला एक आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. गुरुवारी रात्री ९ वाजता शौचालयाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलीचं दोन्ही आरोपींनी अपहरण केलं. यानंतर मुलीला जवळील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुख्य आरोपीचा साथीदार हे कृत्य होत असताना कोणाचंही लक्ष जाऊ नये यासाठी पहारा देत होता.

“दोन्ही आरोपींविरोधात POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या वडिलांना माहिती दिली. वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.” दिल्ली पोलिसांचे DCP आर.पी. मीना यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.

“शौचासाठी घराबाहेर पडलेली मुलगी १०-१५ मिनीटं झाले तरी घरी परतली नाही म्हणून आम्ही तिला शोधायला लागलो. शौचालय घे घरापासून ५०-१०० मीटरच्या अंतरावर आहे. एरवी तिची आई सोबत जाते पण त्यादिवशी मुलीने मी एकटी जाते म्हणून सांगितलं. शोध घेतला असता जंगलाजवळ जखमी अवस्थेत आम्हाला ती सापडली. यानंतर आम्ही तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.” पीडित मुलीच्या घरच्या सदस्यांनी माहिती दिली. पीडित मुलीचे वडील चालकाची नोकरी करतात. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:48 am

Web Title: 13 yr old raped while going to common bathroom police detain neighbour psd 91
Next Stories
1 बिहारमध्ये भाजपासमोर नवं राजकीय संकट; ‘कालिदास’ संबोधल्यानं जदयू, लोजपात बिनसलं
2 पुणेरी पत्रकाराचा डोनाल्ड ट्रम्पना झटका: विचारला अवघड प्रश्न
3 ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’
Just Now!
X