यंदाचा (२०२०) वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार समितीने सोमवारी याची घोषणा केली.

रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.

हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं की, “या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.”