24 November 2020

News Flash

धक्कादायक ! १८ वर्षीय तरुणाचा तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

चिमुरडी रडू लागल्याने बॉक्समध्ये लॉक करुन काढला पळ

तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिला एका बॉक्समध्ये लॉक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारीच राहणा-या १८ वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी घरात एकटी असताना तरुणाने तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि आपल्या घरी घेऊन आला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. चिमुरडी रडत असल्या कारणाने त्याने तिला एका बॉक्समध्ये बंद केलं आणि पळ काढला. चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून शेजा-यांनी धाव घेतली असता, तिला बॉक्समध्ये लॉक केल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. शेजा-यांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं.

‘चिमुरडीचे पालक घरी नसल्याचं तरुणाला माहित होतं. त्यामुळेच त्याने तिला चॉकलेटटं आमिष दाखवत आपल्या घरी नेलं. चिमुरडी रडू लागल्यानंतर तो घाबरला आणि पळ काढला. शेजा-यांनी मुलीची सुटका केली,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 10:09 am

Web Title: 3 year child raped and locked in box by 18 year old neighbor
Next Stories
1 काय आहे काळवीट शिकार प्रकरण?
2 पाकच्या सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवावं, आफ्रिदीला जावेद अख्तर यांचं चोख उत्तर
3 मला अजून एक संधी द्या – मार्क झुकेरबर्ग
Just Now!
X