07 August 2020

News Flash

३३ टक्के खासदार, आमदारांवर फौजदारी गुन्हे

लोकसभेतील सुमारे ३३ टक्के खासदार आणि विविध राज्यांतील आमदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासातून उघडकीस आली आह़े

| September 3, 2013 02:06 am

लोकसभेतील सुमारे ३३ टक्के खासदार आणि विविध राज्यांतील आमदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासातून उघडकीस आली आह़े  ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) असे या संस्थेचे नाव असून निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांसाठी ही संस्था प्रयत्नशील आह़े
पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जनमताचा कौल पडताळण्यासाठी ‘एडीआर’ने केलेल्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात ही बाब पुढे आल्याचे संस्थेकडून सोमवारी सांगण्यात आल़े  या सर्वेक्षणांतर्गत २००४ पासून लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका लढविणाऱ्या ६२ हजार ८४७ उमेदवारांची नोंद करण्यात आली़  यांपैकी ११ हजार ६३ म्हणजेच १८ टक्के उमेदवारांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे खटले आहेत़, तर ५ हजार २५३ म्हणजेच ८ टक्के उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़  यावरून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा कल सहज स्पष्ट होत आह़े

* खासदार – ५४३
*  फौजदारी गुन्हे दाखल असणारे – १६२
*  गंभीर गुन्हे दाखल असणारे –       ७६
*  फौजदारी गुन्हे असणारे देशभरातील आमदार – १,२५८ (३१%).
*  गंभीर गुन्हे असणारे देशभरातील आमदार – २३%

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2013 2:06 am

Web Title: 33 of mps mlas has criminal cases
टॅग Mla,Mp
Next Stories
1 दाऊदसह एकेकाला भारतात परत आणू
2 १०० कोटींचे कंत्राट देण्यासाठी खैरेंचा दबाव
3 महाविस्फोटाची प्रयोगशाळेत निर्मिती
Just Now!
X