विटांच्या भट्टीवर काम करणारी २१ मुले आणि १२ महिलांसह एकूण ४४ वेठबिगारांची सबलगड जिल्हा प्रशासनाने शनिवारी सुटका केली. शेजारच्या उत्तर प्रदेशातील कांशीरामनगरातील हे वेठबिगार आहेत.
जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून अधिकाऱ्यांनी चामरगाव येथील श्रीराम विटांच्या भट्टीवर छापा टाकला आणि ४४ वेठबिगारांची सुटका केली. महेश त्यागी यांच्या मालकीची ही विटांची भट्टी आहे.
सुटका करण्यात आलेल्या वेठबिगारांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत दिली आहे.