गरीबांच्या खात्यात तातडीने ७५०० रुपये जमा करावेत अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यासाठी ६५ हजार कोटींची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लॉकडाउन उठवण्यासाठी मोदी सरकारने आता योग्य नियोजन करावं असंही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी उपाय योजना करा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या सगळ्यांना आज मदत करण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशावेळी गरीबांना, मजुरांना, लघु आणि मध्यम उद्योजकांना आज मदत करायला हवी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधी यांनी मांडलेले ठळक मुद्दे

केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय असणं अत्यंत आवश्यक

मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा करणं गरजेचं

मजुरांना, गरीबांना पाठिंब्याची गरज

न्याय सारख्या योजनांची आज खऱ्या अर्थाने गरज

लघु आणि मध्यम स्वरुपाच्या योजनांना चालना देणं आवश्यक

लॉकडाउन शिथील करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत

केंद्र सरकारने त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणावी

सध्याची वेळ ही कोणतंही राजकारण करण्याची नाही किंवा कोणतीही टीका करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटाशी सगळा देश लढतो आहे. या संकटातून बाहेर पडणं आणि त्यापाठोपाठ अर्थव्यवस्थेचा समतोल राखणं आवश्यक आहे. देशापुढे जे संकट आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

देशातले गरीब, मजूर, कष्टकरी, लघु आणि मध्यम उद्योजक यांना आज मदतीची गरज आहे. आपण जेवढा वेळ त्यांना मदत करण्यात घालवू तेवढी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट होत जाईल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.