News Flash

कसौलीत महिला अधिकाऱ्याची पाठलाग करुन हत्या, आरोपीला मथुरेतून अटक

हिमाचल प्रदेशात बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे

हिमाचल प्रदेशात बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मथुरा येथून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ५१ वर्षीय सहाय्यक नगर नियोजक शैला बाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी यांची हॉटेल व्यवसायिक विजय ठाकूर याने पाठलाग करत गोळी घालून शैला बाला यांची हत्या केली होती.

हत्येचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक शिव कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. आरोपी पोलिसांच्या रडारवर होता. मथुरामधून त्याला अटक करण्यात आली असून चौकशीसाठी सोलानला आणलं जात आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती शिव कुमार यांनी दिली आहे.

पोलीस महासंचालकांनी आरोपीला अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलं आहे. पोलिसांनी राज्याबाहेर जात आरोपीचा शोध घेतल्याने त्यांनी पथकाचं कौतुक केलं आहे. दरम्यान डीजीपी बेकायदा बांधकामाविरोधातील मोहिमेची पाहणी करत आहेत. याआधी आरोपीने पोलिसांना आपण आत्मसर्पण करणार असल्याचा मेसेज पाठवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 8:58 pm

Web Title: accused killed lady officer taking action against illegal construction arrested
Next Stories
1 महिलेने शब्द पाळला; आठ दिव्यांग मुलं घेतली दत्तक
2 मला भाजपामुक्त भारत नको आहे – राहुल गांधी
3 बिहारमध्ये बस पलटी होऊन लागली भीषण आग, २७ जणांचा मृत्यू
Just Now!
X