News Flash

१९ मे पासून एअर इंडिया देशांतर्गत सोडणार विशेष विमाने

१८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल.

लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया १९ मे ते दोन जून दरम्यान देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान ही विशेष विमाने उड्डाण करतील.

१८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम पूर्णपणे नवीन असतील असे मोदींनी काल जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून अजून बुकिंग सुरु झालेली नाही.
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार प्रमुख महानगरांदरम्यान सर्वाधिक विमाने सोडण्यात येतील.

दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:55 pm

Web Title: air india to operate special domestic flights to several indian cities dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मातृत्वाला सलाम! रस्त्यात बाळाला जन्म दिला, त्यानंतर पायी केला १५० किलोमीटरचा प्रवास
2 मोदींच्या भाषणावर शोभा डे म्हणतात, “पॅकेजबद्दलच बोलायचं होतं तर…”
3 चूक लक्षात येताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, सॉरी
Just Now!
X