हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एस बी देव यांच्या मांडीला गोळी लागल्याने दुखापत झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हातून चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि ही दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ दिल्लीमधील लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

एअर मार्शल देव यांनी जुलै महिन्यात हवाई दलाचे व्हाइस चीफ म्हणून पदभार स्विकारला. त्यांनी एअर मार्शल बीएस धनोआ यांची जागा घेतली. धनोआ सध्या एअर चीफ मार्शल पदावर आहेत. एअर मार्शल देव यांनी 15 जून 1979 मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात प्रवेश केला.

एअर मार्शल देव यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. नुकतंच त्यांना राफेल करार योग्य असल्याचं सांगितलं होतं. लोकांना योग्य माहिती नसून, याबद्दल आपल्याला काही बोलायचं नसल्याचं ते म्हणाले होते.